You are currently viewing थोडा वेळच बोलू देना मौनासोबत

थोडा वेळच बोलू देना मौनासोबत

मराठी बालभारती, थीम सॉंग, शॉर्टफिल्म करिता लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुनंदा भावसार यांची अप्रतिम गझल रचना

थोडा वेळच बोलू देना मौनासोबत
गप्पांचेही नाद वाटती मजला आफत

मृत्यू असतो दबा धरूनी सदासर्वदा
कोठेकोठे अंगावरती मिरवू चिलखत !

हवीहवीशी अता शांतता मिळतच नाही
दोन मनांचा झगडा आतच माझ्या अलबत !

आता कोठे वाट जराशी कळली आहे
कसा चढावा ,गझलेचा मी अवघड पर्वत?

शब्दाचेही कसे किती तू अर्थ काढशी?
दक्ष किती मी ,राहू असल्या नात्याबाबत…

नको पाहूस डोळ्यांमध्ये तू डोकावत !
बुडते आहे,काठावरही तुझेच गलबत…

कशी *सुनंदा* आनंदाने राहू शकते?
व्यथा-वेदना करत नाहीत आता खलबत !

सौ.सुनंदा सुहास भावसार
नंदुरबार
90963 49241

प्रतिक्रिया व्यक्त करा