You are currently viewing सिद्धार्थ गृहनिर्माण संस्थेतर्फे उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव

सिद्धार्थ गृहनिर्माण संस्थेतर्फे उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव

कणकवली

विश्वभुषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 131वा जयंती उत्सव सिद्धार्थ गृहनिर्माण सहकारी संस्था कलमठ यांच्यावतीने 14 व 15 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. अभिवादन, सायं. 4 ते 7 वा. फनीगेम्स, प्रश्नमंजुषा, होममिनिस्टर व रांगोळी स्पर्धा होणार आहे. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 ते 9 वा. अभिवादन सभा व बक्षीस वितरण होणार आहे.

सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष गणपत पवार भूषविणार आहेत. यावेळी सामाजिक लोकशाहीची नायिका-स्त्री विषयावर प्रा. सुषमा हरकूळकर तर संविधानानंतरचा भारत आणि भारतीयांमधील बंधूभाव प्रा. पी.जे कांबळे यांचे मार्गदर्शन होणार आहे. रात्री 10 वा. नंतर सांस्कृतिक व विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गणपत पवार व सचिव अंकुश पवार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा