कला रसिकांना चांगली पर्वणी
वस्ञनगरीत हटकर कोष्टी समाज बहुद्देशीय सेवाभावी ट्रस्टच्या वतीने समाजातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने घोरपडे नाट्यगृहात येत्या ६ मे ते ८ मे या कालावधीत कोष्टी कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष राहुल तेलसिंगे यांनी आज मंगळवारी पञकार बैठकीत बोलताना दिली.
हटकर कोष्टी समाज बहुद्देशीय सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून समाज बांधवांना संघटीत करतानाच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात.याशिवाय विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यावर देखील विशेष भर दिला जातो.याच उद्देशाने हटकर कोष्टी समाजातील
कलाकारांना त्यांच्यातील अंगभूत कलागुणांना योग्य व्यासपीठ निर्माण करून त्यांच्या कलांचे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी इचलकरंजी येथे
हटकर कोष्टी समाज बहुद्देशीय सेवाभावी ट्रस्टच्या वतीने घोरपडे नाट्यगृहात येत्या ६ मे ते ८ मे या कालावधीत कोष्टी कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष राहुल तेलसिंगे यांनी आज मंगळवारी पञकार बैठकीत बोलताना दिली.तसेच
सदर प्रदर्शनामध्ये राज्यातील वेगवेगळ्या राज्यस्तरीय बक्षीस पात्र व राज्यांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या कलाकारांना सोबत घेऊन तसेच आपला व्यवसाय सांभाळून
कलेमध्ये पारंगत असलेल्या
महिलांबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलेला संधी देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.यामध्ये कला महाविद्यालयातील विद्यार्थी जि डी आर्ट ,कमर्शिअल आर्टिस्ट यांची निसर्गचित्रे ,व्यक्तिचित्रे ,आर्कचित्रे , माती काम स्थापत्य कलेतील शिल्पे , कल्पक शिल्पकृती ,काष्ट शिल्प , कल्पक पोस्टर्स, छायाचित्रकारांची छायाचित्रे शिल्प कृती यांचा समावेश असणार आहे.विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी चिञकला व महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.तरी या कोष्टी कला महोत्सवाचा
सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष राहुल तेलसिंगे यांनी केले.यावेळी हटकर कोष्टी समाज बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे युवक अध्यक्ष हेमंत कबाडे , शिल्पकार निखिल करोसे , विनायक चिखलगे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.