You are currently viewing आमदार नितेश राणे यांचा शिवसेनेला धक्का

आमदार नितेश राणे यांचा शिवसेनेला धक्का

फोंडाघाट मधील शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

कणकवली

फोंडाघाट येथील अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती भाजपा कडून देण्यात आली आहे. आ. नितेश राणे यांनी शिवसेनेला हा एक प्रकारे धक्का दिल्याचे बोलले जात आहे. नितेश राणे यांनी फोंडाघाट मधील अनेक तरुण शिवसैनिकांना भाजपमध्ये प्रवेश देत त्यांचे स्वागत केले.

यावेळी गणेश लाड, पांडुरंग लाड, अनिकेत लाड, गोरक्षनाथ लाड, सूर्यकांत लाड, विनायक लाड, समीर लाड, तुषार लाड, गौरव लाड, आदित्य लाड, संतोष बागवे, साहिल लाड, संजय लाड, सुशांत लाड, नागेश लाड, साहिल पवार, भावेश लाड, चिन्मय लाड, अजय लाड, नागेश गुरव, प्रथमेश लाड, राजेंद्र बागवे, अनिश गुरव, अनंत लाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी आ. नितेश राणे यांच्यासोबत माजी सभापती मनोज रावराणे, बबन हळदिवे, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजन चिके सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा