You are currently viewing “आनंद घन”…

“आनंद घन”…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ कवी, गायक, संगीतकार, गीतकार, श्री.अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना*

 

*”आनंद घन”*

 

श्रीराम आहे अनादि आनंद घन

धर्मात्मा धर्म वत्सल असे धर्मज्ञ।। ध्रु।।

 

अंतर्यामी सदा जपावे रामनाम

अवीट गोडीचे नाम करूया स्मरण

जीवन एक भक्तियोग जाई बनून।।1।।

 

राम कथा ऐकाव्या नाम घ्यावं वाणीनं

मेघश्याम मूर्ती पहावी ती डोळ्यांनं

सर्व काळ श्रीरामाचे करावे चिंतन।।2।।

 

दयाळू रूप सुंदर असे कमलनयन

मुखावर आश्वासक भाव राही विलसून

धनुर्धारी बघून कळिकाळ जाय पळून।।

 

श्रीराम आदर्श पुत्र भ्राता राजन

मर्यादशील पराक्रमी असे युद्ध निपूण

गाऊ श्रीराम जयराम जय जय राम।।4।।

 

श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.

Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा