You are currently viewing क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले / स्त्री शिक्षणाचे उद्गाता

क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले / स्त्री शिक्षणाचे उद्गाता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखिका कवयित्री सौ.आशा भावसार यांनी क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*

 

क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले / स्त्री शिक्षणाचे उद्गाता

 

स्त्रीशिक्षणाचा विडा उचलूनी लढले आयुष्यभर

दीनदलितांची आई सावित्रीबाई अन् ज्योतिबा थोर //

स्त्री जातीचा करण्या उद्धार

स्त्री शिक्षणाचे महत्व फार

स्त्रीमुक्तीचे बीज पेरले अपार

स्त्रीशिक्षणाचा विडा उचलूनी लढले आयुष्यभर

दीनदलितांची आई सावित्रीबाई अन् ज्योतिबा थोर //1//

ज्ञानाचे उघडण्या दार

भोगून हाल न मानती हार

जनसेवेचा पक्का निर्धार

स्त्रीशिक्षणाचा विडा उचलूनी लढले आयुष्यभर

दीनदलितांची आई सावित्रीबाई अन् ज्योतिबा थोर //2//

रंजल्या गांजल्यांचे अश्रू पुसणार

निराधाराचां होण्या आधार

समानतेचा सदा विचार

स्त्रीशिक्षणाचा विडा उचलून लढले आयुष्यभर

दीनदलितांची आई सावित्रीबाई आणि ज्योतिबा थोर //3//

 

सौ. आशा सचिन भावसार

जालना.

मो. नं. 7768071099

प्रतिक्रिया व्यक्त करा