You are currently viewing सिनेअभिनेते भरत जाधव यांच्या व्हिडीओची आ. वैभव नाईक यांनी घेतली दखल

सिनेअभिनेते भरत जाधव यांच्या व्हिडीओची आ. वैभव नाईक यांनी घेतली दखल

कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचा रंगमंच ३० फूटापर्यंत वाढविणार

आ. वैभव नाईक यांनी सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नाट्यगृहाची केली पाहणी

 

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ येथे भव्य कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह उभारले जात आहे. मराठी सिनेअभिनेते भरत जाधव यांनी कुडाळ येथे भेट देऊन नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नाट्यगृहाच्या रंगमंच्याच्या प्लॅन बाबत व्हिडीओ प्रसारित करत सूचना केली होती. त्यामध्ये भरत जाधव यांनी नाट्यगृहाचा रंगमंच ३० फूटापर्यंत वाढविण्याची सूचना केली. त्याची त्वरित दखल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व आर्किटेक्ट यांच्यासमवेत आज नाट्यगृह व भंगसाळ नदीची पाहणी केली.याप्रसंगी कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचा रंगमंच २४ फुटावरून ३० फूटापर्यंत वाढविण्याची सूचना केली. त्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले.

तसेच नाट्यगृहाच्या इंटिरिअर प्लॅन बाबतही सिनेअभिनेते भरत जाधव यांसह जेष्ठ नाट्यकर्मींच्या सूचना लक्षात घेऊन नवीन प्लॅन बनविण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कुडाळ भंगसाळ नदी येथे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार असून त्याची पाहणी देखील यावेळी करण्यात आली.लवकरात लवकर हे काम सुरु करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी आवश्यक सूचना अधिकारयांना केल्या.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, उपविभागीय अधिकारी राजन चव्हाण, शाखा अभियंता प्रदीप पाटील, अमोल बिराडे, नाट्यगृहाचे आर्किटेक्ट अमोल कामत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा