You are currently viewing सावंतवाडी कुटीर रुग्णालयाच्या डायलिसिस विभागात घुसला “नाग”….

सावंतवाडी कुटीर रुग्णालयाच्या डायलिसिस विभागात घुसला “नाग”….

सावंतवाडी

येथील कुटीर रुग्णालयाच्या डायलिसिस विभागात आज चक्क नाग घुसला. हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर सर्पमित्र राजन निब्रे यांच्या मदतीने त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार यांनी दिली. दरम्यान रुग्णालय प्रशासनाने सुरक्षेसाठी योग्य ती उपाय योजना राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील रुग्णालयातील डायलिसिस विभागात चक्क नाग घुसल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर सर्वांचीच तारांबळ उडाली. यावेळी घटनेची माहिती सर्पमित्र श्री. निब्रे यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या नागाला जेरबंद केले. व नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा