You are currently viewing मजा जगण्याची

मजा जगण्याची

^मजा जगण्याची^

काहीतरी गमविण्यापेक्षा,
क्षणभर…
मिळविण्याची मजा वेगळीच असते.
मिळालेले सुखाचे दोन क्षणही,
आयुष्यभर …
जपण्याची मजा वेगळीच असते.

बंद डोळ्यांनी कुणाचीतरी,
आठवण …
काढण्याची मजा वेगळीच असते.
आठवणीतील तो स्पर्श,
नाजूकसा…
अनुभवण्याची मजा वेगळीच असते.

कुणीतरी यावे हळूच स्वप्नात,
स्वप्न…
पाहण्याची मजा वेगळीच असते.
स्वप्नात का होईना पुन्हा आठवणींच्या,
डोहात…
डुबण्याची मजा वेगळीच असते.

अश्रू बनतात शब्द,
शब्दांचे बनते काव्य…
खरंच…
कुणाच्यातरी आठवणीत,
जगण्याची मजा वेगळीच असते.

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा