ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी…
सावंतवाडी
माडखोल नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ तसेच झाडी वाढल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन ग्रामस्थांचे नुकसान. त्यामुळे संबंधित नदीपात्रातील गाळाचा ३१ एप्रिल पर्यंत उपसा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने माजी सरपंच संजय लाड यांनी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. दरम्यान याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास १ मे रोजी माडखोल व कारिवडे गावातील ग्रामस्थ येथील तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन श्री. लाड यांनी प्रसिद्धीस दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित नदीपात्र पूर्णपणे झाडाझुडपानी आच्छादलेला आहे . त्यामुळे जास्त अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा प्रवाह बंद होऊन आजूबाजूच्या लोकवस्तीमध्ये घुसून रात्री अपरात्री पूरपरिस्थिती येत असते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. व जिवितहानी होऊ शकते, हे नाकारता येत नाही . ज्वलंत उदाहरण म्हणजे २३ जुलै २०२१ रोजी रात्रौ ठिक १२.३० च्या सुमारास अतिवृष्टी होऊन मोठा पूर आला होता. व त्या पूरामध्ये अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . त्यामुळे नदीपात्रातील वाढलेले जंगल , झाडे झुडपे व कचरा नदीपात्र स्वच्छ करून ग्रामस्थांवर होणारी आपत्ती दूर करावी. यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करून ३१ एप्रिल पूर्वी नदीपात्र स्वच्छ करावे, अन्यथा एक मे रोजी माडखोल कारिवडे ग्रामस्थांच्या वतीने सावंतवाडी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.