You are currently viewing बाप कुठेच नसतो

बाप कुठेच नसतो

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ यांची अप्रतिम काव्यरचना

वरवर कठोर दिसणारा बाप
आतून खूप हळवा असतो
सर्वांची काळजी घेणारा
बाप मात्र
कोणालाच कळत नसतो

बाप घराचा आधार होवून जगतो
सर्वांना सांभाळून एकत्र ठेवतो
खरतर बापाशिवाय घर
पुर्ण होत नाही
बापाच्या वेदना मात्र
कोणी समजून घेत नाही

घरात पाऊल टाकताच
आई आई करायचं
दिसली नाही की
बापाला विचारायच
बाप घरात असतानाही
आईचाच गजर सुरू असतो
पोटतिडकीने वाट
बघणारा बाप मात्र
कोणालाच दिसत नसतो

बाप कसाही असला तरी
काहीच कमी पडु देत नाही
लेकरंबाळांना लाचारीने
कुठेही झुकू देत नाही
काहीझाल तरी
आईलाच विचारत असतात
देण्या घेण्यासाठी मात्र
बापाला पुढे करतात

घरात बाप नसल्यावर
विचारणा कधी होत नाही
कुठे गेलेत बाबा अस
कोणी म्हणतही नाही
ईथेतिथे आईचाच
पुढाकार असतो
कुटुंबासाठी राबणारा
बाप मात्र कुठेच नसतो

आईच्या नावे खूप गाणी
कविता असतात
बापासाठी मात्र शब्द
सुचत नसतात
इतिहासाच्या पाणावर
आईचे मातृत्व लिहले असते
बापाच्या कर्तृत्वाचं पान
कोरेच दिसते

बाप सर्वांसाठी असतो
पण बापासाठी कोणीच नसतो
बाप आपल्यातून जातो
तेव्हा बाप कळतो
बापाशिवाय कपाळाचा
कुंकूही शोभून दिसत नसतो

*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा