You are currently viewing राधारंग फाऊंडेशनच्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न

राधारंग फाऊंडेशनच्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न

वेंगुर्ला :

 

कोरोना कालावधीतही राधारंग फाउंडेशनने अनेक स्पर्धा आॕनलाईन स्वरुपात घेतल्या होत्या.त्या सर्व स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ दि. ३ एप्रिल रोजी अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

स्पर्धांचा निकाल खालील प्रमाणे –

*स्वर्गीय मीना सुभाष झारापकर स्मृति शिष्यवृत्ती परिक्षा*

*इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा*

प्रथम क्रमांक – कुमारी समृद्धी विलास सरनाईक.मालवण

द्वितीय क्रमांक – कुमारी पूर्वा परशुराम गुरव.मालवण

द्वितीय क्रमांक – कुमार रुद्र संजय जाधव.मालवण

तृतीय क्रमांक-नित्या विजय सावंत. वेतोरे

*इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा*

प्रथम क्रमांक- आदित्य रमाकांत नाईक. पाट

द्वितीय क्रमांक- विक्रम अनिरुद्ध मेहंदळे.मालवण

तृतीय क्रमांक-वेदांत संतोष गोसावी मालवण

*कै. अनुराधा अनिल तिरोडकर काव्य वाचन स्पर्धा* 

1.अर्पिता अमेय सामंत -परुळे हायस्कुल

2.गायत्री पुरुषोत्म नाईक- वेतोरे हायस्कुल

3.तन्वी गणपत चौकेकर- टोपीवाला हायस्कुल मालवण

4.विजया सुरज पावसकर – वेतोरे हायस्कुल

*स्व. वसंत सरनाईक स्मृती गणित-विज्ञान शिष्यवृत्ती परीक्षा*

प्रथम-परी सामंत-परुळे हायस्कूल

द्वितीय-मेघन नाईक-वेतोरे हायस्कूल

तृतीय-(विभागून-3 विद्यार्थी)

यश कदम-टोपीवाला मालवण

पार्थ गोसावी-पाट हायस्कूल

तुषा वारंग-परुळे हायस्कूल

*कॕरम स्पर्धा*

बाल गट

विजेता-सोहम राऊळ

उपविजेता- राजस राऊळ

महिला गट

विजेती- सौ.ज्योती देसाई

उपविजेती – श्रीमती चित्रा सामंत

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी वेतोरे हायस्कूल मधील हरहुन्नरी शिक्षक श्री. चैतन्य सुकी सर यांच्या महत्वपुर्ण योगदानाबद्दल त्यांना सदर कार्यक्रमात *गुरुगौरव* पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आले.

तसेच राधारंगच्या यशामधे महत्त्वपूर्ण योगदान असलेले माड्याचीवाडी हायस्कुलचे आदर्श व उपक्रमशील शिक्षक श्री. दिपक सामंत यांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानासाठी *कर्मयोगी* पुरस्कार व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून परुळे हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक श्री.बी.एस.नाईक सर,काव्यवाचन स्पर्धेच्या परिक्षिका कु.प्रियांका प्रभू तेंडोलकर तसेच राधारंगचे उपाध्यक्ष अॕड.प्रमोद देसाई,सौ.अरुणा सामंत,सौ.तृप्ती प्रभू,सौ.स्वाती वालावलकर,सौ.पूर्वा नाईक,अमेय देसाई,प्रथमेश नाईक हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा