You are currently viewing इन्सुली-सोसायटी निवडणुकीत वर्चस्व आता सेना की भाजपचं?

इन्सुली-सोसायटी निवडणुकीत वर्चस्व आता सेना की भाजपचं?

 

*सावंतवाडी :*

 

जिल्ह्यात सर्वत्र सोसायटी निवडणुकीची बिगूल वाजत असताना इन्सुली सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गावात सेना-भाजप संघर्ष दिसुन येत आहे. भाजपचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष संजय राणे यांनी आपल्या काही समर्थकांसोबत भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपची अडचण वाढल्याचीही चर्चा गावात सुरू आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या चुरशीप्रमाणे इन्सुली-सोसायटी निवडणुकीत वर्चस्व आता सेना की भाजपचं असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकुण १३ जागांवर ही लढत आहे. त्यातील एक जागा सेनेने आधीच बिनविरोध जिकंत आपली ताकद दाखवून दिली आहे. आता १२ जागांसाठी सेनेचे १२ + भाजपचे १२ असे एकूण २४ उमेदवार रिंगणात आहेत. महत्वाचे म्हणजे या निवडणुकीत दोन दिग्गज म्हणजेच सेनेचे सरपंच-गंगाराम वेंगुर्लेकर उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. तसेच भाजपचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ ‌पेडणेकर सुद्धा या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे ही लक्षणीय लढत अत्यंत चुरशीची होणार यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा