You are currently viewing भग्न मूर्ती लपवलीस तू

भग्न मूर्ती लपवलीस तू

गजलेच्या क्षेत्रातील शिवाजी म्हणून ओळख असणारे अहमदनगर जिल्ह्यातील गझलकार डॉक्टर शिवाजी काळे यांची अप्रतिम गझल रचना

भग्न मूर्ती लपवलीस तू
की विसर्जन विसरलीस तू

काय झाले अभंगा तुला
एक ओवी रडवलीस तू

सर्व काही मिळाले मला
आणि नकळत हरवलीस तू

पंख आहेत इच्छे तुला
का अशी शांत बसलीस तू

एक वादळ तुला जड कसे
ती लव्हाळी बघितलीस तू ?

साखळी तर दिसेना कुठे
मग कशाने जखडलीस तू

आब राखून मर वेदने
ज्या दिमाखात जगलीस तू

मी स्वतःच्याच आलो जवळ
दूर जेव्हा सरकलीस तू

पण इथे मात्र हरलीस तू
चक्क प्रेमात पडलीस तू

डॉ. शिवाजी काळे

प्रतिक्रिया व्यक्त करा