You are currently viewing कणकवलीत गुढीपाडव्या निमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कणकवलीत गुढीपाडव्या निमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

आमदार नितेश राणे यांचीही स्वागत यात्रेला उपस्थिती

छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता चित्ररथ लक्षवेधी ठरले

कणकवली

कणकवली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्यावतीने नववर्षाच्या स्वागतसाठी कणकवली शहरात’ हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली, या शोभा यात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता चित्ररथ लक्षवेधी ठरले. महिला व पुरुषांनी यात्रेतील सहभाग हा पारंपरिक वेषभूषा करत मोठ्या संख्येने घेतला होता. ही शोभा यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक, बाजारपेठ, विद्यामंदिर पटांगणावरील शिवारा मंदिर येथे सांगता करण्यात आली.

हिंदू नववर्षाच्या निमित्ताने शोभा यात्रेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे यांनी सहभागी हाेत यात्रेची शाेभा वाढविली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, , युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेविका सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, रुपेश नार्वेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, अजय गांगण, बंडू ठाकूर, अण्णा कोदे, सामाजिक कार्यकर्ते आनंद पारकर, संजय मालडकर, दादा कोरडे, नंदकुमार आरोलकर, सुनील सावंत, वैजयंती करंदीकर, मृणाल ठाकूर, दत्तप्रसाद ठाकूर, समर्थ राणे हे सहभागी झाले होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा