माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा, तथा भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांचा लेख
झणझणीत भरपूर मसालेदार तिखट आपणं आत्ता आणि आपले पूर्वजांपासून हे वर्ष ते पुढचे वर्ष तयार करण्याची पद्धत आहे महिलांसाठी हक्काचे आणि विश्वासाचं हत्यार माणल जात मसाले वापरून केली जाणारी एक चटणी आणि एखाद्या व्यक्तीला माराहान करुन केली जाणारी चटणी वेगळीच असते ते म्हणजे चटणी डोळ्यात पडली तर डोळ खराब जेवणात जास्त झाली तर पोट खराब म्हणून मिरची पासून विविध मसाले यांची पारख महिला बरोबर करतात
फेब्रुवारी मार्च एप्रिल हे महिने उन्हाचे असल्याने प्रामुख्याने या दिवसांतच चटणी केली जाते प्रत्येक गावात शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी बाजार व मोठ मोठी मिरची विक्री करणारी दुकानें असतांत * बेडगी * गुंटूर * लवंगी * देशी * शंकेशवरी * ज्वाला * अशी विविध जातींच्या कमी जास्त तिखट असणारी मिरची विक्री साठी ठेवलेली असते मिरची दर्जानुसार त्याचा दर ठरवलेला असतो आणि या मिरच्या बाजारात दुकानात विक्रीसाठी आणण्याअगोदर वजन वाढावे यासाठी पाणी मारले जाते आणि एक किलो मिरची खरेदी केली असता सातसे ग्रम मिरची ग्राहकांच्या पदरात पडते मग दहा किलो मिर्ची खरेदी केल्यावर किती तुट होत असेल म्हणजे पैसे दहा किलो च मिरची सात किलो आणि व्यापारी वजन करताना काटा मारतो तो वेगळाच ग्राहकाला दाखवली जाते एक आणि दिली जाते एक लालभडक चटणी होणार वाळलेली आहे दुकानांवर पाल लालभडक असत वरन ऊन त्यामुळे मिर्ची लालभडक दिसते आणि ग्राहक फसतो
बाजार मोठा भरलेला असतो आणि आपल्या आई बहीण मिरचीचा बाजार करण्यासाठी एक मिरची विक्री करणारे दुकान निवडतात आणि चालू होते मिरची पूराण लाल आहे चविला आहे देशी आहे आम्ही स्वस्त देतो बाजारात फिरुन दराची चौकशी करा अशी एक नाही अनेक फसवी उत्तरे दिली जातात आणि आपल्या आई बहीणी आपणास वर्षभर चटणी करायची म्हणजे कटकट संपेल लग्न असेलतर चटणी करता येत नाही कोणी मयत झाले असेलतर चटणी करता येत नाही उन्हाळा संपेल मग पाऊसाळा सुरू होईल अशा एक नाही अनेक अडचणी असतात त्यातच पैसे कमी असतात कमीत कमी खर्चात बसविणे हा सुद्धा उदेश असतो मिरची विक्री करणारे यांची एक अट असते मसाला घेतला तर मिरचीचा दर एक आणि नुसती मिरची घेतली तर दर एक मग चटणीचा मसाला घ्यायचे ठरतं मसाला विक्री करणारे दुकानदार यांच्या दुकानापुढे कोणत्या मसाल्याचे दर काय आहेत याचा कोठेही दर निश्चित केलेला बोर्ड नसतो मसाल्याचा दर्जा काय आहे याचा सुध्दा कोठेही उल्लेख नसतो फक्त मिरची जेवढी किलो आहे त्यानुसार मसाला काढला जातो
* जिरे *खोबरे *धने *लवंग * दालचिनी *मिरे *शहाजिरे * हिंग * चिरफळ * नाकेशवर *म वेलदोडे * रामपत्री * जायपत्री * बदामफूल * दगड फुल * तमालपत्री * तिळ * खसखस * मेथी * मोहरी * सुंठ * बडिशेप * सोरेगडे * जायफळ * हळद * हि वेलची * लसूण * कांदा * मिरची अशा विविध २९ प्रकारचें मसाले मिरचीची चटणी करताना वापरले जातात आणि मसाला विक्री करणारा दुकानदार पटापट पुड्या बांधायला सुरुवात करतो कोणता मसाल्याचे किती वजन आहे त्याचा दर आणि दर्जा काय आहे हे ग्राहकाला करण्याअगोदर सर्व मसाला काटा मारत मारत वजन केला जातो आणि मसाल्याचे बिल आपल्यापुढे सरकवले जाते मग अगोदरच वाढवून दर लावून वजन केलेला मसाला ग्राहकांच्या समाधानासाठी पैसे घेताना वाढवून लावलेलेच पैसे कमी केले जातात म्हणजे २९ मसाले वाढवून प्रत्येक मसाल्याच्या पाठीमागे १० रुपये वाढवून लावले आणि १०० रूपये सर्व बिलात कमी केलं आणि आपणं म्हणतो मसाल्यात दुकानदार यांने १०० कमी केले अस फसवर जात आपणांस चटणी मसाले दर माहीत नाही आपणं प्रत्येक मसाल्याचे दर विचारणे गरजेचे आहे त्यात घाण किड आहेत का याची खात्री करायला हवी फसविणारया पेक्षा फसणारे मूर्ख आहेत
चटणी मसाला काय पण हे मिरची मसाले विक्री करणारे यांचें कांदा लसूण विक्री करणारे यांचें बरोबर लागेबांधे असतांत आम्ही सांगतो तिथ कांदा घया गरवा कांदा पाहिजे लसूण मोठा चांगला पाहिजे पण ज्या दुकानदाराकडे मिर्ची मसाला विक्री करणारे पाठवितात त्याचा सुध्दा दर बाजारपेठे पेक्षा जास्तच असतो माल बाजारात आहे तोच पण किंमत डबल असा ग्राहकांना लुटण्याचा अड्डाच आहे मिरची बाजार आजचं सावध व्हावे निरखून पारखून माल खरेदी करा वजन बघा मालाचा दर्जा बघा फसू नका फसवू नका
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको मागणी अर्ज निवेदन तक्रार अर्ज प्रचार प्रसार प्रसिद्धी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९