You are currently viewing चैत्रपाडवा

चैत्रपाडवा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर यांची गुढीपाडव्याच्या निमित्ताने लिहिलेली अप्रतिम काव्यरचना

चैत्र शुद्ध प्रतिपदा
दारी गुढी ऊभी छान
नव्या वर्षाचा आरंभ
आनंदाचे गीत गान..

पाने फुले आंबा निंब
पाटावर रंगावली
वस्त्र रेशमी जरीकाठ
गुढी अशी सजवली…

महत्वाचा हिंदुसण
साडेतीन मुहुर्ताचा
नव्या वस्तु खरेदीचा
दिन शुभमांगल्याचा…

चौदा वर्षे वनवास
संपवूनी राम आला
गुढ्या दारी ऊभारल्या
आनंदीआनंद झाला….

विश्व निर्मीले ब्रह्माने
याच मासी याच दिनी
ब्रह्मध्वज कुणी म्हणे
काठी पूजा शुद्ध मानी…

ऋतु वसंत प्रसन्न
आतुरता स्वागताची
नवे वर्ष नवी स्वप्ने
गुढी असे प्रतीकांची…..

राधिका भांडारकर पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा