जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांचे नवीन वर्षाचे स्वागत करणारी अप्रतिम काव्यरचना
स्वागतम् सुस्वागतम् नववर्षा
चे
नव संकल्प नव स्वप्न जीवनांचे …!!धृ! !
दिस आले ते असेच रिते गेले
जीवन क्षणाक्षणानी ते घटले
वाया गेले क्षण कुणा ना पटले
आता आपणच थोडे सावरायचे ….!!१!!
व्यसने सोडून देईन हो झडकरी
मावा, घुटका मटका नाश करी
थुंकणार नाही धरती स्वच्छ करी
नव जीवनाला नव आकार साकारायचे …!!२!!
जपुनी वापरेन मीही पाणी
स्वच्छ ठेवीन गाव अन्न पाणी
कच- याची करीन विभागणी
गाडगेबाबा नित्य मनी आठवायचे ….!!३ !!
रक्षीन मुलगी सन्मान देऊनी
हुंडा प्रथा मोडेन मनातुनी
नवसूर्य देईन तिच्या मनी
मुलगी जन्मा तिचे सन्मान करायचे ॥४!!
अति वापर मोबाईल सोडून देऊ
पुस्तके वाचनांचा नव ध्यास लावू
नव ते स्वीकारु जुने ते सारे त्यागू
प्रकाशाचे गीत नवे सारे मिळून गायचे …!!५ !!
स्वकष्टाचा करूनी नव संकल्प
झाडे रक्षण्या राबवून नव प्रकल्प
सेंद्रिय शेतीने करीन कायाकल्प
हरितक्रांतीचा नव दीप मनी लावायचे !..!!६!!
नवा जोश, नवा उत्साह, नव चेतना
हर्षाने तालात नाचत साहे वेदना
राग, लोभ, मोह, मत्सर त्यागुनी
नव दिनांचा हस्याचा गुलकं चाखायचे !७!
© मुबारक उमराणी
राजर्षी शाहू काॅलनी
शामरावनगर, सांगली
मो९७६६०८१०९७.