You are currently viewing किल्ले पाहिलेला माणूस माहितीपट वेंगुर्ले येथे होणार प्रदर्शित 

किल्ले पाहिलेला माणूस माहितीपट वेंगुर्ले येथे होणार प्रदर्शित 

वैभववाडी

शनिवार दि.२ एप्रिल, २०२२ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ निर्मित *गोपाळ नीलकंठ दाण्डेकर – किल्ले पाहिलेला माणूस* हा माहितीपट महाराष्ट्रात एकाच दिवशी प्रदर्शित होत आहे.
ज्यांनी दुर्ग ही तीर्थक्षेत्रे मानली व संपूर्ण आयुष्य दुर्ग भ्रमंतीमध्ये झोकून दिले, असे *दुर्ग महर्षी – गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर* यांच्या आयुष्यावर आणि विचारांवर हा माहितीपट बनवण्यात आला आहे. किल्ले हे स्फूर्ति स्थाने आहेत, त्यांचे जतन, संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हा या माहितीपटामागील दृष्टिकोन आहे.
ज्यांनी दुर्ग ही तीर्थक्षेत्रे मानली व संपूर्ण आयुष्य दुर्ग भ्रमंतीमध्ये झोकून दिले.
या माहितीपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्री.मिलिंद भणगे यांनी केले असून सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी निवेदन केले आहे. तसेच श्री. अमोल साळुंके यांनी चित्रिकरण केले आहे.


या महितीपटाची निर्मिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली आहे.
हा माहितीपट गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले नगरीत डॉ. राजेश्वर उबाळे यांचे संजीवनी हॉस्पिटल सभागृहात शनिवार दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये प्रदर्शित होत आहे. या कार्यक्रमाला डॉ.प्रल्हाद मणचेकर, अँड. देवदत्त परूळेकर, श्री. प्रकाश नारकर व प्रा.एस्.एन.पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना (MASD) आणि वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांनी केले आहे.
या माहितीपटाला प्रवेश विनामूल्य असून जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी डॉ.राजेश्वर उबाळे
(02366263739),
डॉ.संजीव लिंगवत
(9421268268) डॉ.कमलेश चव्हाण (9420207055) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा