नगरसेविका प्राजक्ता बांदेकर यांनी वेधला होता लक्ष
कुडाळ
नक्षत्र टॉवर येथे असलेल्या सार्वजनिक विहिरीला झाडांसह प्लास्टिकच्या साहित्यांनी वेढले होते,याकडे भाजपच्या नगरसेविका प्राजक्ता बांदेकर यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधल्यानंतर विहिरीचा परिसर साफ करण्यात आला. दरम्यान,या ठिकाणी एक व्यापारी आपले प्लास्टिकचे साहित्य ठेवत होता हे साहित्य अखेर काढण्यात आले, त्यामुळे आता विहिरीने मोकळा श्वास घेतला अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.
नक्षत्र टॉवर येथे सार्वजनिक विहीर आहे आणि या विहिरीचे पाणी नक्षत्र टॉवरमधील काही नागरिक वापरतात मात्र या टॉवरच्या जवळच असलेल्या एका व्यापाऱ्यांनी या विहिरीच्या सभोवताली आपल्या दुकानातील प्लास्टिकच्या टाक्या तसेच इतर साहित्य टाकल्या होत्या तसेच विहिरीला सुद्धा पुर्ण झाडांनी व्यापलेले होते हे साहित्य काढण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती अखेर भाजपच्या नगरसेविका प्राजक्ता बांदेकर यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांना याबाबत कारवाई करण्यास सांगितले मुख्याधिकारी यांनी स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर यांना पुढील कारवाईसाठी आदेश दिले अखेर या विहिरीच्या सभोवताली असलेले त्या व्यापाऱ्याचे प्लास्टिकचे साहित्य काढण्यात आले तसेच विहिरीला जखडलेल्या झाडांची साफसफाई करण्यात आली त्यामुळे विहिरीने मोकळा श्वास घेतला अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त केली जात होती गेले अनेक वर्ष या ठिकाणी हा व्यापारी प्लास्टिकचे आपल्या दुकानातील साहित्य विहिरीच्या सभोवताली ठेवत होता हे साहित्य अखेर त्या ठिकाणाहून काढून टाकण्यास भाजपचे नगरसेविका प्राजक्ता बांदेकर यांनी हिंमत दाखवली याबाबतही त्यांचे कौतुक होत आहे.