गोवंश रक्षण समितीची मागणी; जिल्ह्यातील घटनेवरुन जिल्हाधिकार्यांना निवेदन…
कुडाळ
जिल्ह्यातील बैलझुंजी दरम्यान एका वेंगुर्लेतील बैलाचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील बैलांच्या झुंंजीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी गोवंश रक्षण समितीच्या माध्यमातून अविनाश पराडकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
यात असे नमुद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात एका ठिकाणी झालेल्या बैल झुंजीत एका बैलाला आपला जीव गमवावा लागला आहे. हा सर्व प्रकार किळसवाणा आणि भयावह आहे. त्यामुळे असे प्रकार रोखण्यात यावेत,असे या पत्रात म्हटले आहे.