बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजप्रबोधन समन्वय समिती यांचे आयोजन
समाज मंदिर येथे होणार हिमोग्लोबीन आणि नेत्रतपासणी शिबीर
सावंतवाडी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती वर्षानिमित्त बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजप्रबोधन समन्वय समिती सावंतवाडी यांच्यातर्फे जिल्हास्तरीय खुली जयभिम चषक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ही स्पर्धा होणार आहे.
तरी इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या वक्तृत्व स्पर्धेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रेरणा, भारतीय संविधान हे जगातील श्रेष्ठ संविधान, मानवमुक्ती लढा आणि बाबासाहेब, ‘बुध्द आणि धम्म’ या ग्रंथाचा उपदेश, स्त्री-मुक्ती चळवळ आणि बाबासाहेब, ओबीसी आरक्षण आणि बाबासाहेब, बाबासाहेबांचा निधर्मवाद हे विषय ठेवण्यात आले आहेत. तर स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांक
रुपये २ हजार, चषक व प्रशस्तिपत्र, द्वितीय क्रमांक रुपये १५०० व प्रशस्तिपत्र, तृतीय क्रमांक रुपये १ हजार व प्रशस्तिपत्र तर उत्तेजनार्थ रुपये ५०० व प्रशस्तिपत्र अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत. प्रत्येक स्पर्धकाला सादरीकरणासाठी वेळ १० मिनिटे असेल. स्पर्धेचे माध्यम मराठी असेल. ८ एप्रिल पर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल. स्पर्धेच्या नियमात ऐनवेळी बदल करण्याचा हक्क संयोजकांकडे राखीव आहे. प्रथम तीन क्रमांकास १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती कार्यक्रमास सादरिकरणाची संधी दिली जाईल. सदर स्पर्धा समन्वय समिती सावंतवाडी या फेसबुक पेजवर लाइव्ह होईल.
याकरिता अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आयु.विठ्ठल कदम 9823048126, आयु.विनायक जाधव 9096567561 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजप्रबोधन समन्वय समिती , सावंतवाडी आयोजित विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ जयंती वर्षानिमित्त हिमोग्लोबीन आणि नेत्रतपासणी शिबीर दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी १० ते दु.२ वाजेपर्यंत समाज मंदिर, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी आयु.जयराम जाधव 8308152284 व आयुनी.कविता निगुडकर 8275665230 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.