You are currently viewing सुखाची बेरीज…

सुखाची बेरीज…

लालित्य नक्षत्रवेल समूह संस्थापक लेखक कवी श्रीकांत दीक्षित यांचा अप्रतिम लेख

धन्यवाद भाव साकार करणे म्हणजे दुसरं तिसरे काही नसून एक अंतरीक समाधान प्राप्त करणे होय…मनुष्य  प्रत्येक वस्तूकडे पैशांच्या माध्यमातून पहात असतो. पण कधी कृतज्ञ होऊन पहा..प्रत्येक वस्तूसाठी पैसाच पेरला गेला पाहिजे ही त्याची धारणा. खरंच माणसाने स्वतःचा  आवाका आणि स्वतःचे स्थान  स्वतः च  ओळखलेले नाही .कशाला मोल लावावे आणि कशाला मोल लावू नये हेच माणसाला उमगलेले नाही

माणसांने लीन होणे म्हणजेच दोन्ही हात भावपुर्वक जोडणे. संसार सुखाचा करायचा तर मग..!! ज्याला आपण संसार म्हणतो तो बाह्यतः भोगाने घडविला असला तरी त्याचा आत्मा त्यागाचा आहे. सारे आयुष्य खुराड्यात काढायला लागणाऱ्या माणसांना क्षितिजाचे दर्शन कधी काळी झाले तर ते काव्याच्या पुस्तकात व्हायचे पण अशाच लोकांना संसारात दुःखापेक्षा सुख अधिक असते.
धन्यवाद भाव साकारल्याने जीवन बाग रंगी बेरंगी फुलांनी बहरून जाते.. मिळतो तो निख्खळ आनंद. मग ही आनंदाची पुरचुंडी कनवटीला बांधून निघायचे पुढच्या प्रवासाला..!! वाटेत असंख्य निवडूंगाची झाडे, काही काटेरी वनस्पती भेटतील.. पण त्यांच्या इवल्याशा खरचटण्याने रक्तबंबाळ न होता.. तो एक अनुभव होता व तो आपल्या रस्त्याकडे वाट लावून पहात असतो.. असावी ती पारखी नजर, वेचावे  तो अनुभवाचे क्षण. हेच क्षण जीवनात येणारे वादळ थोपवून शकतात. मग नेहमीच करत रहावी सुखाची बेरीज..संचित करत रहावा आनंद!!..

*श्रीकांत दीक्षित, पुणे.*

प्रतिक्रिया व्यक्त करा