You are currently viewing ‘भलं’ आणि ‘कल्याण’

‘भलं’ आणि ‘कल्याण’

विश्वप्रार्थनेत सर्वांचं भलं कर,कल्याण कर’ असा ‘ उलेख आलेला आहे. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत का?*

 

*’भलं’ आणि ‘कल्याण’ या दोन गोष्टी भिन्न आहेत.संसार आणि परमार्थ ही जीवनरथाची दोन चाके आहेत.जीवनरथ सुरळीत चालण्यासाठी या दोन्ही चाकांची आवश्यकता आहे.* संसारी जीवन जगत असताना सर्वसाधारणपणे माणसाला सुख-दु:खाच्या अनेक प्रसंगाना तोंड द्यावे लागते.प्रत्यक्षात ‘सुख कणभर आणि दुःख मणभर’ अशी अनुभूती माणसाला येत असते.

म्हणून तुकाराम महाराज सांगतात,

सुख पहाता जवापाडे । दु:ख पर्वता एवढे ।।

ही बिकट परिस्थिती बदलावी असे माणसाला मनापासून वाटते.तो मनापासून इच्छा करतो की,’सुख मणभर व दुःख कणभर’ अशी परिस्थिती निर्माण व्हावी.त्यासाठीच प्रत्येक माणूस धडपड करीत असतो, कष्ट करीत असतो व विविध प्रसंगांना सामोरे जात असतो.

🎯 *जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून ‘सुख मणभर व दुःख कणभर’ अशी परिस्थिती प्राप्त करून घेणे अवघड नाही.त्यासाठी प्रत्येक माणसाने आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे.अशी मानसिकता बदलण्यात ज्याला यश मिळते त्याचे भले होते.थोडक्यात,संसारात सुस्थिती प्राप्त होऊन सुखी जीवन प्राप्त होणे म्हणजे माणसाचे भले होणे.म्हणून सर्वांचं भलं कर’ अशी प्रार्थना केलेली आहे.*

🎯 *मात्र ‘कल्याण’ या शब्दाचा अर्थ वेगळा आहे.माणसाचा जन्म मिळणे ही परम भाग्याची गोष्ट समजली जाते.याचे मुख्य कारण असे आहे की,परमेश्वराचा म्हणजेच आपल्या दिव्य सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात्कार करून घेण्याचे सामर्थ्य माणसाला प्राप्त झालेले आहे.त्याचप्रमाणे माणसाला विलक्षण बुद्धीचे वरदान प्राप्त झालेले आहे.या बुद्धीच्या बळावर माणूस चंद्रावर जाऊ शकतो,त्याचप्रमाणे तो स्वरूपचंद्राचा अनुभवामृतसुद्धा घेऊ शकतो.परमेश्वराचा म्हणजेच दिव्य सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात्कार झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनाचे सार्थक होत नाही.*

म्हणून तुकाराम महाराज सांगतात,

 

*तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक ।*

*विठ्ठलची एक देखीलिया ।।*

 

*अशी जन्माची सार्थकता प्राप्त होते तेव्हा माणसाच्या जीवनात दैत्याचे म्हणजेच अहंकाराचे राज्य संपते आणि त्याच्या जीवनात विठोबाचे राज्य निर्माण होऊन त्याला जीवनातील प्रत्येक दिवस म्हणजे आनंदाची दीपावली आहे अशी अनुभूती येते.* या संदर्भात नामदेव महाराज हेच सांगतात,

 

*विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी* |

*विष्णूदास नामा जीवे भावे ओवाळी ||*

 

*माणसाला अशी अनुभूती येणे यालाच ‘कल्याण’ असे म्हणतात.सर्वांना हे भाग्य लाभावे म्हणून ‘सर्वांचं कल्याण कर.’असे विश्वप्रार्थनेत प्रार्थिलेले आहे.*

 

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा