तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा माझा मानस आहे – आ. नितेश राणे
कणकवली विधानसभा मतदारसंघात ‘कमळ चषक २०२२ बॉक्स’ क्रिकेट स्पर्धा देवगड, वैभववाडी, कणकवली तालुक्यातील १८ जिल्हा परिषद मतदासंघांत घेण्यात येणार आहे. एप्रिलमध्ये या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. युवा मोर्चा आणि जिल्हा परिषद सदस्य, भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेतली जाणार असल्याची माहिती आ.नितेश राणे यांनी दिली.
या क्रिकेट स्पर्धेची जबाबदारी भाजपा मंडल अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यावर असेल. त्या त्या जिल्हा परिषद सदस्य यांना सर्व अधिकार असणार आहे. जागोजागी स्पर्धा असणार आहेत. गावागावात या स्पर्धा होत असतात. स्थानिक क्रिकेटपटूंच्या कौशल्याला वाव मिळावा, अशी माझी संकल्पना आहे. तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा माझा मानस आहे. येत्या काळात टाईम टेबल जाहीर करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.