जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलकार अरविंदजी ढवळीकर यांची अप्रतिम गझल रचना
फसवणारे चेहरे मज जेंव्हा कळाया लागले
गर्दीतुनी मग पाय माझे मागे वळाया लागले
हंसलो सदा फसलो तरी सारेच सोपे वाटले
लॊकिकाच्या दिंडी सवे थोडे पळाया लागले
नव्हतेच कोणी सोबती रस्ते रिकामे भासले
चुकलेच कोठे उमजले धागे जुळाया लागले
मस्तीत मी नाही कुणाही हात केंव्हाजोडले
जगलो कसा याचे पुरावे ते मिळाया लागले
चारचॊघां सारखी जरि जन्मयात्रा उरकली
घेता विसावा भान ही आतां गळाया लागले
कां घडे विपरीत न कळे क्षण कसे भारावले
भावनांचे पाश ते अवचित जळाया लागले
प्रेम ,सेवा हाच ठेवा माझ्यात होता ईश्वराचा
कळले जसे नाते तिथे होते रुळाया लागले
अरविंद
२८/११/२०१९