*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ यांची अप्रतिम काव्यरचना*
पाहून तुला त्या दिवसांची
आजही आठवण होतेय
डोळ्यांनाही का तुझ्या
तेच दिसतेय
नको पाहूस तू चोरून मला
नजर तुझी अजूनही
माझ्याच कडे वळतेय
गोड हसणे तुझे
जराही कमी झाले नाही
खळी तुझ्या गालावरची
जराही रूसली नाही
आठवतय मला
बट केसाची मागे घेवून तू
हळूच कटाक्ष टाकायची
तुझ्या मनातल हितगूज
मला नजरेने सांगायची
एकदा भेटावे असे
तुला आणि मलाही वाटायचे
न भेटल्याने अश्रु डोळ्यात दाटायचे
कधी केंव्हा तू दुर झालीस
मलाही कळलेच नाही
तुला शोधण्यास पाऊले
माझे वळलेच नाही
खूप दिवसांनी आज मी
पाहीले तुला
तू जशी होती तशीच आहे
जराही तू बदलली नाहीस
तुझ्यातुन मला वेगळे केले नाहीस
नकळतपणे एकमेकास
पाहिले जरी
तरी येवू नकोस तू भेटण्यास
वाटा आता वेगळ्या
झाल्यात आहेत
गहीवरून गेले मन
तुझे नी माझे
आता फक्त आठवणीच
उरल्या आहेत
*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८