शिक्षण घेऊन सुद्धा नोकऱ्या मिळत नाहीत मग शिक्षण घेण्याची आवश्यकता काय?
*’नोकऱ्या मिळविण्यासाठी शिक्षण घ्यायचे’ ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे.* नोकऱ्या कमी व त्या मिळविण्यासाठी प्रयत्न करणारी मुले असंख्य,अशी परिस्थिती असल्यावर सर्वांना नोकऱ्या मिळणारच कशा?त्यात लोकसंख्येची दिवसेंदिवस भर पडत गेल्यामुळे हा प्रश्न अधिकच उग्र होत आहे. *विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यामुळे सुद्धा काम करण्यासाठी माणसांची गरज घटत चाललेली आहे.अशा परिस्थितीत नोकऱ्या मिळण्यासाठी शिक्षण घेणे ही कल्पनाच मुळात चुकीची ठरते.जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून शिक्षण घ्यावयाचे ते मनाच्या व बुद्धीच्या कक्षा रुंदावण्यासाठी.त्यासाठी वाचन,श्रवण,चिंतन,अभ्यास व मार्गदर्शन यांची आवश्यकता असते.* शिक्षण संपल्यावर पोट भरण्यासाठी नोकरी मिळण्यावर लक्ष न ठेवता कांहीतरी स्वतंत्र व्यवसाय करणे उचित ठरेल. *अशिक्षित लोक सुद्धा भांडवल नसताना धंदा करून खूप पैसे मिळवितात.अशी अनेक उदाहरणे आमच्या पाहण्यात आहेत.मग सुशिक्षितांना स्वतंत्र व्यवसाय करून पैसे मिळविण्यास का अडचण पडावी?स्वत:ला व इतरांना उपयोगी पडणारा उद्योग हा सर्वात श्रेष्ठ योग आहे,हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.*
🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏