सन 2021 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये केंद्रशाळा शेर्पे शाळेतील चार विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले शाळेचा निकाल शंभर टक्के लागला .त्यातील अथर्व सत्यविजय सावंत हा विद्यार्थी राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाचवा आला .त्याचेच शासकीय विद्यानिकेतन सातारा या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी निवड झालेली आहे . अथर्व च्या या निवडीबद्दल शेर्पे सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे या शैक्षणिक गुणवत्तेमुळे सर्वत्र कौतुक होत आहे . शासकीय विद्यानिकेतन या ठिकाणी निवड झाल्याबद्दल त्याचे व त्याच्या पालकांचे मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे .अथर्वच्या शासकीय विद्यानिकेतन मध्ये झालेल्या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे शेर्पे गावचे सरपंच निशा गुरव, उपसरपंच अरुण ब्रह्मादंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास पांचाळ ,शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष महेंद्र शेलार ,विनोद शेलार तसेच शाळेचे सर्व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले .तर अथर्व सावंतच्या यशात सहभागी असलेले त्याचे पालक श्रीम. राणे मॅडम , मार्गदर्शक शिक्षक – अमोल भंडारी , दशरथ शिंगारे , राजू गर्जे , दिपाली खुटा ले , -मुख्याध्यापक – दशरथ शिंगारे व केंद्रशाळा शेर्पेचे पालक व ग्रामस्थ यांचे विशेष अभिनंदन कणकवली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे ‘ केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल यांनी केले .
केंद्रशाळा शेर्पेच्या विद्यार्थ्याचे शासकीय विद्यानिकेतनमध्ये निवड
- Post published:मार्च 27, 2022
- Post category:बातम्या / वैभववाडी
- Post comments:0 Comments