You are currently viewing सावंतवाडी शहरात 5 ठिकाणी कंटेन्मेंट झोन तर तालुक्यात 9 ठिकाणी कंटेन्मेंट झोन…

सावंतवाडी शहरात 5 ठिकाणी कंटेन्मेंट झोन तर तालुक्यात 9 ठिकाणी कंटेन्मेंट झोन…

सिंधुदुर्गनगरी

सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील वार्ड –एफ, स्वरुपानंद सोसायटी मधील सदनिका क्र. 300क/16 चा परिसर  येथे दि. 08 ऑक्टोंबर 2020 पर्यंत, माठेवाडा येथील निर्माण रेसीडन्सी या इमारतीमधील तिस-या मजल्यावरील सदनिका क्र. टी-1 चहुबाजुंचे अंदाजे क्षेत्र-45 चौ.मी. चा परिसर येथे दि. 11 ऑक्टोंबर 2020 पर्यंत, खासकीलवाडा येथील गोविंद प्लाझा, दुस-या मजल्यावरील फ्लॅट नं. 202 पुरता पूर्व बाजूस-2 मी, पश्चिम बाजूस -1 मी, उत्तर बाजूस -0.5 मी. व दक्षिण बाजूस 4 मी असा सुमारे 44 चौ. मी. चा परिसर, सालईवाडा येथील वार्ड-एफ, राजेंद्र अपार्टमेंट दुसरामजला सदनिका क्र. 299 अ/19 चा परिसर, खासकीलवाडा येथील गोठण रोड, घर क्र. ई 511 पुरता पूर्व बाजूस-4 मी, पश्चिम बाजूस -5 मी, उत्तर बाजूस -3 मी व दक्षिण बाजूस -10 मी. असा सुमारे 140 चौ.मी चा परिसर येथे दि. 07 ऑक्टोंबर 2020 पर्यंत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मौजे कोलगांव-चव्हाटावाडी येथील घर क्रमांक 152 चा 50 मीटर परिसर, मौजे माजगांव-नाईकवाडा येथील घर क्रमांक 1377 चा 20 मीटर परिसर येथे दि. 05 ऑक्टोंबर 2020 पर्यंत, मौजे आरोंदा-माडयेवाडी येथील घर क्र. 316 अ चा 30 मीटर परिसर, मौजे आंबोली-बाजारवाडी येथील घर क्र. 932 चा 25 मीटर परिसर येथे दि. 06 ऑक्टोंबर 2020 पर्यंत, माजगांव-मेटवाडा येथील घर क्र. 1702/102 चा 05 मीटर परिसर, मळगांव-रस्तावाडी येथील घर क्र. 988 चा 20 मीटर परिसर, बांदा-लकरकाटे येथील घर क्र. 1642 चा 05 मीटर परिसर येथे दि. 07 ऑक्टोंबर 2020 पर्यंत, मौजे-चराठे-गावडेशेत येथील घर क्र.125 चा 20 मीटर परिसर येथे दि. 08 ऑक्टोंबर 2020 पर्यंत, मौजे माडखोल-वरकोंडवाडी येथील घर क्र. 728 चा 50 मीटर परिसर येथे दि. दि. 10 ऑक्टोंबर 2020 पर्यंत  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

सदर कंटेन्मेंट झोनमध्ये संबंधित दिनांकापर्यंत रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा