जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार यांची अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना
तिले हायद लागनी, तिले हायद लागनी
लेक लाडकी बापनी, लेक लाडकी बापनी….
घर जेवाडात वऱ्हे, घर जेवाडात वऱ्हे
लेक जाई आते पऱ्हे,लेक जाई आते पऱ्हे
वाजा वाजतसं दारे,वाजा वाजतसं दारे
लेक जाई आते मनी….लेक लाडकी ..बापनी…
घर आंगन कुदेल,घर आंगन कुदेल
मन अंग बी खुंदेल,मन आंग बी खुंदेल
गाय बकऱ्या वासऱ्या, तिन्या हातन्या बांधेल
जागा हुई जाई सुनी.. लेक लाडकी… बापनी…
तांब्याभरी कोन लई ..तांब्या भरी कोन लई
बांध बाशिंग ती जाई.. बांध बाशिंग ती जाई
मांगे फिरी फिरी देखी, मांगे फिरी फिरी देखी
लेक लाडनी लाडनी..लेक लाडकी… बापनी …
घर हुई जाई सुनं, घर हुई जाई सुनं
लुटी गये मनं धनं, लुटी गये मनं धनं
हात गयाम्हानं टाकी, म्हनी कोनं आते बापू
मना काळीजना घडं कसा परकाले सोपू…
लेक लाडकी बापनी ….
आते लागनी हो टाई,आते लागनी हो टाई
लेक परकानं धनं लेक परघरं जाई
असा कसा हो रिवाज,मनं काईज फाटनं
वारावरं सोडी दिधी,घरम्हानी रानजाई….
लेक लाडकी … बापनी …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २० मार्च २०२२
वेळ : दुपारी ३: १०
वऱ्हे.. लग्ना आधी लग्नघरी गोंधळ किंवा वऱ्हे म्हणजे
भाऊबंधांना पुरणाचे गोड जेवण देण्याची प्रथा खानदेशात
आहे.
पऱ्हे .. दूर
वाजा .. वाजंत्री
कुदेल.. खेळली आहे.
खुंदेल.. अंगाखांद्यावर नाचली आहे .
टाळी लागणे.. लग्न लागणे.
काईज ..काळीज
अहिराणीत काही शब्द असे…
गुळ ..गुई
डाळ.. दाय
माय ..माडी
ऊनी .. आली
गई … गेली