येणाऱ्या काळात तालुक्यातील अनेक कामे लवकरच पूर्ण होतील : हरी खोबरेकर
मालवण तालुक्यातील वायरी गर्दे रोड येथील गटार बांधणी कामाचा शुभारंभ प्रदीप वेंगुर्लेकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. या कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी ५ लाखाचा निधी मंजूर केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी मतदारसंघात कोट्यवधींचा निधी आणला आहे. येणाऱ्या काळात तालुक्यातील अनेक कामे प्रस्तावित आहेत, ती लवकरच पूर्ण होतील अशी ग्वाही तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.
आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शुक्रवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, घनशाम झाड, संदेश तळगावकर, प्रसाद आडवणकर, भगवान लुडबे, प्रदीप मयेकर, गोत्य मसुरकर, देवदत्त धुरी, विजय टक्के, विक्रम लुडबे, यासह अन्य उपस्थित होते.