सिंधुदूर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल – रायगड यांच्या सहकार्याने साहस प्रतिष्ठान,या दिव्यांगांच्या सर्वांगीण विकास,न्याय व त्यांचे हक्क यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या सावंतवाडी आणि वेंगुर्ले शाखेस प्रत्येकी एक संगणक संच उपलब्ध करून दिला,त्याबद्द्ल स्वंस्थेच्या संस्थापक सौ रुपाली पाटील यांनी ,सिंधुदूर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल – रायगड,यांचे आभार मानले,तसेच वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूल,येथेही एक संगणक वितरित करण्यात आला त्यावेळी शाळेच्या हेडमास्तर सौ.नीलिमा वालावलकर यांनी आपल्या संगणका मुळे विद्यार्थांना शेक्षणिक लाभ घेता येणार आहे असे सांगितले व सिंधुदूर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल,रायगड यांचे आभार मानले,हे संगणक वितरित करण्यासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्या रहिवासी हितवर्धक संघा तर्फे अध्यक्ष श्री केशव राणे,सचिव श्री रामचंद्र मोचेमाडकर(बाप्पा),सहसचिव श्री दीपक तावडे आणि संपर्क प्रमुख श्री गुरुदास वाघाटे यांनी सहभाग घेतला,सदर संगणक श्री दत्ताराम सुतार यांच्या अथक प्रयत्नांनी मंडळाला उपलब्ध झाले त्यांच्या या कार्याचे कौतुक करून अध्यक्ष श्री केशव राणे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले .
सिंधुदूर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल – रायगड यांच्यातर्फे संगणक संच उपलब्ध
- Post published:मार्च 25, 2022
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments