You are currently viewing एम आय आर मशिन दुरुस्ती करणे आहे

एम आय आर मशिन दुरुस्ती करणे आहे

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश आंदोलन प.महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

सांगली जिल्ह्यातील दुर्बल व गरीब घटकातील लोकांना स्वस्त व मापक दरात सवलतीच्या दरात प्रत्येक आजारांवर उपचार घेणे सोप व्हावे यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या नावाने 1914 साली मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले या रुग्णालयात सर्व साथीचे आजार संसर्गजन्य आजार एक्सरे सिटी स्कॅन एम आय आर डिलिव्हरी सिझर डिलिव्हरी अपघात विभाग मोफत औषधोपचार मोफत औषधे विविध आॅपरेशन अश्या सेवा सुविधा असणारे टोलेजंग शासकीय हाॅसपिटल जनतेच्या सेवेसाठी तयार करण्यात आले
सांगली जिल्ह्याला बारा तालुके आहेत बारा तालुक्यातून लोकांचा विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी निर्धन लोकांचा लोंढा सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी येत असतो
‌‌ बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियनचे संस्थापक अध्यक्ष यांनी आज आपल्या घरच्या पेश़टचा एम आय आर करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला भेट दिली आणि एम आय आर करणारे शिकाऊ वैद्यकीय कर्मचारी यांची भेट घेतली आणि एम आय आर संबंधित चौकशी केली यावेळी वैद्यकीय कर्मचारी यांनी अहमद नबीलाल मुंडे यांना अशी काही उडवाउडवीची उत्तरे दिली कि एम आय आर मशिन चालू आहे पण कंबरेचा एम आय आर करण्यासाठी वापरली जाणारी एम आय आर रिंग नादुरुस्त आहे आज दोन महिन्यांपासून ती दुरुस्त करण्यासाठी येणारे इंजिनिअर हे मुंबई हून केव्हा येतील माहिती नाही एम आय आर मशिन केव्हा सुरू होईल झाली तर चार दिवसांत होईल नाहीतर महिना सुध्दा लागू शकतो
आपल्यापुढे मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ज्या रुग्णांना या एम आय आर ची गरज आहे त्यांचे काय ? कारणं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी येणारे गरिबच असतांत जर या लोकांच्या कडे पैसे असते तर त्यांनी खाजगी दवाखान्यात एम आय आर केला नसता का ? फक्त नाव नोंदवून घेण्याशिवाय शासकीय दवाखान्यात कर्मचारी काहीच काम करत नाहीत पेशंटला व्यवस्थित मार्गदर्शन राहिलें पण वागणूक सुध्दा व्यवस्थित नाही एम आय आर मशिन सुरू होईल तेव्हा फोन करतो या वैद्यकीय कर्मचारी यांचा काही रुग्णाला फोन येत नाही त्याचा काय उपचार होत नाही म्हणजे निर्धन आणि गरिब लोकांनी विना उपचार वेदना सहन करुन मरायच का ?
शासन म्हणतंय ” आत्ता रुग्ण होणार नाही लाचार कारण आत्ता उपचार होणारं मोफत ” हे फक्त लिहिलं जात आहे खरोखरच असं होत नाही परवा आरोग्य मंत्री यांनी सांगितले की आत्ता शासकीय रुग्णालयात मोफत रक्त पुरवठा केला जाणार आहे कुठ होत आहे कां ?
आपल्याला लागलेला सर्वात मोठा शाप म्हणजे रेशनकार्ड वर्गवारी म्हणजे अंत्योदय केशरी शुभ्र रेशन कार्ड अशी वर्गवारी करण्यात आली आहे त्यानुसार ” महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना “” राजीव गांधी जीवनदायी योजना “” पंतप्रधान आयुष्मान योजना ” यांचा लाभ मिळविण्यासाठी रेशनकार्ड वर्गवारी सर्वात महत्वाचा दुवा आहे म्हणजे शासनाने यापूर्वी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनाच आरोग्य योजनांचा फायदा देण्याचा निर्णय घेतला होता नंतर लोकांचा वेळ आणि पैसा वाचावा सर्वांना आरोग्य दायी योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासनाने सर्व रेशनकार्ड धारकांच्या साठी सर्व आरोग्य योजनांचा जसं महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजना राजीव गांधी जीवनदायी योजना पंतप्रधान आयुष्मान योजना यांचा मोफत लाभ देण्याचा निर्णय घेतला पण आज सर्व उलट झाल आहे कारणं आजसुद्धा आपल्या सर्वांना रेशनकार्ड वर्गवारी याचा फटका सहन करावा लागत आहे कारणं आज दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवळे रेशनकार्ड धारकांना सर्व आरोग्य योजना मोफत दिल्या जातात पण केशरी रेशनकार्ड धारक व शुभ्र रेशन कार्ड धारक यांना या सर्व शासकीय योजनाचा लाभ शासनाने ठरवून दिले की दिड लाखांपर्यंत मोफत द्या पण आज केशरी शिधापत्रिका धारक व शुभ्र शिधापत्रिका धारक यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यामध्ये पैसे मोजावे लागत आहेत उदा म्हणून सांगतो की जो एम आय आर करायला खाजगी दवाखान्यात ५५०० रूपये खर्च येतो तोच एम आय आर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत असतो आणि केशरी शुभ्र शिधापत्रिका धारकांना २००० रुपये भरावे लागतात अस का ?
२००५ साली सदन आणि दुर्बल या आर्थिक निकषांवर एक सर्वे झाला होता त्यानुसार नेते पुढारी मंत्री खासदार आमदार यांचें बगलबच्चे यांचीच नांवे या दारिद्र्य रेषेखालील सर्वे मध्ये सर्व सदन लोकांची नाव घातली आणि त्यांनाच आजपर्यंत सर्व दारिद्र्य रेषेखालील आरोग्य योजनाचा लाभ दिल जात आहे म्हणजे आज दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे होऊन १६ वर्ष झाली पण हाच सर्वे आजपर्यंत पुन्हा झाला नाही त्यामुळे सदन लोक गोरगरीब लोकांच्या हक्कांवर साप बनून बसले आहेत हाच दारिद्र्य रेषेचा सर्वे पुन्हा झाल पाहिजे म्हणजे खरोखरच दुर्बल लोक त्यांच्या हक्काच्या आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी इषटांक या तत्वावर त्याचा हक्क मिळेल आणि मिळवून घेतील ज्याच्या घरासमोर महागडी गाडी, दोन मजली पक्के घर, शिवाय मुलेही सरकारी नोकरीत तरीही अनेक लोक रेशनदुकानांसमोर रांगेत उभे असतात. हा प्रकार केवळ नाशिकचाच आहे असे नाही तर कमी अधिक प्रमाणात सर्वत्र असेच चित्र दिसून येते. जिल्ह्यातही अशा प्रकारचे जवळपास ४० टक्के लाभार्थी आहेत. मात्र, त्यांची माहितीच पुरवठा विभागाला नसते आणि मग केवळ चर्चाच होते.
पात्र लाभार्थ्यांचा धान्याचा लाभ मिळावा, गोरगरिबांपर्यंत अन्नधान्य पोहोचावे यासाठी स्वस्त दरात धान्य पुरवठा योजना राज्य शासनाकडून राबविली जाते. केंद्राकडूनही मोफत धान्य दिले जाते. ही एक महत्त्वाकांक्षी योजना सर्वांना लाभदायी अशीच आहे. चुकीची आणि खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेणारे लोक शोधून काढण्याचे काम यंत्रणेचे आहे. मात्र, अशा प्रकारची मोहीम राबविली जात नसल्याने रेशनचा सुरू असलेला पुरवठा अजूनही सुरूच आहे.
रेशनचे धान्य किती कुणाला?
अंत्योदय : या योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रति कुटुंब ३५ किलो रेशन मिळते, ज्यामध्ये २० किलो गहू आणि १५ किलो तांदूळ असतो. लाभार्थींना गहू २ रुपये किलो दराने आणि तांदूळ ३ रुपये किलो दराने उपलब्ध आहे.
दारिद्र्य रेषेखालील : दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकेवर प्रत्येक कुटुंबाला महिन्याला १० ते २० किलो रेशन दिले जाते. बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने कमी दराने मिळते.
प्राधान्यक्रम कार्ड : प्राधान्य घरगुती शिधापत्रिकेवर दर महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो रेशन उपलब्ध आहे. यामध्ये तांदूळ तीन रुपये किलो आणि गहू दोन रुपये किलो दराने दिला जातो.
अनेकांचे ४५ ते ५९ हजारांपर्यंतच वार्षिक उत्पन्न?
रेशनवरील धान्य घेणाऱ्या अनेकांचे वार्षिक उत्पन्न हे अवघे ४५ ते ५९ हजारांपर्यंतच असल्याची अनेक कार्डधारक आहेत. त्यांच्या सामाजिक परिस्थितीकडे पाहिले तर त्यांचे वार्षिक उत्पन्न खरेच इतके कमी असेल का? असा प्रश्न कुणालाही पडावा असेच आहे. परंतु, याबाबत तपासणी होतच नाही.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यामधील कार्यरत एम आय आर मशिन लवकरात लवकर सुरू करण्यात यावी यासाठी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांचेकडून मा जिल्हाधिकारी मा आरोग्य मंत्री मा मुख्यमंत्री व सांगली जिल्हा पालकमंत्री यांना निवेदन देणार आहे लवकरात लवकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असणारे एम आय आर मशिन सुरू झालं नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचेकडे आर्थिक बळ नाही अस समजून भिक मागो आंदोलन करणार आहोत
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा