जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री हसीना पठाण यांची अप्रतिम काव्यरचना
*मुर्तिरूपे भगवंत उभा गाभाऱ्यात*
*तेवतो नंदादीप प्रसन्न देव्हाऱ्यात*
*सुंदर , सोज्वळ , मनोहारी रुप जसे*
*समईच्या प्रकाशात उजळूनी दिसे*
*हे बघून मनात मज वाटे असे*
*घरोघरी पण देवी-देवता वसे*
*जिच्या माथ्यावर नसतो मुकुट सोनेरी*
*पण.., डोक्यावरती चमकतात केस रुपेरी*
*नयनात करुणभाव , दयेचे आगर*
*मायबाप असतात ममतेचे सागर*
*डोळ्यांभोवती बघा झाली काळी वर्तुळे*
*कष्ट करून ज्यांनी उद्धरली आपली कुळे*
*खऱ्या पुजनीय असतात अश्या वात्सल्यमुर्ती*
*युगानुयुगे राहील वंदनीय त्यांची किर्ती*
*भक्तिभावे नमन करावे , मनात किंतु ना आणावा*
*मुर्तिमंत उभा असा… देव तेथेचि जाणावा …!*
✍🏻 *हसिना पठाण*
*नासिक रोड*