You are currently viewing आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

२६ रोजी ग्रामीण रुग्णालय येथे मोफत नेत्र तपासणी, हृदयरोग, रक्त तपासणी…

 

शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा २६ मार्चला होणारा वाढदिवस  विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले.

मालवण येथील दैवज्ञभवन येथे शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाबी जोगी, मंदार केणी, दीपा शिंदे, श्‍वेता सावंत, बाळ महाभोज, मंदार ओरसकर, अंजना सामंत, पूजा तोंडवळकर, सेजल परब, पूनम चव्हाण, सन्मेष परब यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ रोजी ग्रामीण रुग्णालय येथे मोफत नेत्र तपासणी, हृदयरोग, रक्त तपासणी केली जाणार आहे. याचदिवशी शिवसेना शाखा कार्यालय येथे अपंग बांधवांना दुचाकींचे वाटप करण्यात येणार आहे. महिलांसाठी दैवज्ञभवन येथे खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. मोतिबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी २६ ते ३१ मार्च या कालावधीत तालुक्यात होणार आहे. त्यानंतर ८ ते १० एप्रिल या कालावधीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

२६ तारखेला शिवसेना वायरी भुतनाथ विभागाच्यावतीने माधवबाग कणकवली यांच्यावतीने वायरी भुतनाथ शाळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. कट्टा येथे युवासेनेच्यावतीने डबलबारीचेही आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर शहरात प्रत्येक प्रभागात शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना मोफत जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी माहितीही श्री. खोबरेकर यांनी दिली. शिबिराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी शिवसेना शाखा कार्यालय भरड- दत्ता पोईपकर (९४०५६१९८७१) यांच्याकडे नावनोंदणी करावी असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा