डेरवन युथ गेम्स मध्ये साहिश व श्रिया अतुल नाखरे यांना सुवर्णपदक
सावंतवाडी:
नुकत्याच डेरवण रत्नागिरी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धे मध्ये सिंधुुदूर्गातील उपरकर शुटिंग अकॅडमीच्या नेमबाजांनी सहभागी होत चमकदार कामगिरी केली.
ही स्पर्धा दोन वयोगटामध्ये तसेच तीन क्रीडा प्रकारांमध्ये घेण्यात आली.यात 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कु.साहिश दिगंबर तलनकर (मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव) याने ४०० पैकी ३७७ गुणांची नोंद करत १७ वर्षा खालील गटात सुवर्ण पदक पटकाविले हे त्याचे सलग दुसऱ्या वर्षी मिळवलेले सुवर्ण पदक आहे.तसेच या स्पर्धे मध्ये पहिल्यांदाच सहभागी होणारी कु.श्रिया अतुल नाखरे मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी हिने याच क्रीडा प्रकारात ३४६ गुण मिळवत १४ वर्षा खालील गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले.
कु.श्रिया ही आंतरराष्ट्रीय नेमबाज श्री. अतुल नाखरे यांची कन्या होय.
त्याच बरोबर 1४ वर्ष व १९ वर्षा खालील गटात कु. आयुष दत्तप्रसाद पाटणकर (मदर क्वीन्स, सावंतवाडी) याने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ४०० पैकी ३६० गुण मिळवत २ कांस्य पदके पटकाविली.
कु.साहीश व कु.आयुष हे २५ मार्च पासून सुरू होणाऱ्या भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धे साठी भोपाळ येथे रवाना होतील
वरील सर्व खेळाडू उपरकर शुटिंग अकॅडमी येथे सराव करत असून त्यांना प्रशिक्षक श्री.कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण लाभले तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री.विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन मिळाले.
सर्व पदक विजेत्या तसेच सहभागी खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शुटिंग असोसिएशन च्या पदाधकार्यानी विशेष अभिनंदन केले.