You are currently viewing कळसुली-कणकवली मार्गावर रिक्षा पलटी झाल्याने दोन युवती गंभीर

कळसुली-कणकवली मार्गावर रिक्षा पलटी झाल्याने दोन युवती गंभीर

डंपरने हूल दिल्याने झाला अपघात

कणकवली

कळसुली ते कणकवली या मार्गावर शिरवल येथे रिक्षा पलटी होऊन दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. डंपरने हूल दिल्याने हा अपघात झाल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली.
कळसुली – गागोसखल येथुन कणकवलीत रिक्षेने येत असताना समोरून येणाऱ्या डंपरने हुल दिल्यामुळे रिक्षा बाजूला घेताना रिक्षा पलटी होत यात कळसुली येथील दोन सख्या बहिणी नम्रता घाडीगावकर व निकिता घाडीगावकर या गंभीर जखमी झाल्या. हा अपघात मंगळवारी सकाळी ८ वा. च्या दरम्यान शिरवल मध्ये कळसुली रस्त्यावर घडला. अपघातानंतर रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने अधिक उपचाराकरता त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी मदत कार्यासाठी धाव घेतली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री वागदे माजी सरपंच संदीप सावंत, कळसुली उपसरपंच सचिन पारधीये, सुशात दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा