You are currently viewing न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा

न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश आंदोलन समिती प.महाराष्ट्र उपाध्यक्ष, माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

पूर्वजांनी सर्वात महत्वाची शिकवण आपणांस दिली आहे. या शब्दकोशात सांगितले प्रमाणे आपणं लहान लहान गोष्टी कडे जास्त लक्ष देण्यामुळे मोठा संपत्तीचा. जीवाचा. शैक्षणिक वैद्यकीय आर्थिक मानसिक सामाजिक दहशतवाद नक्षलवाद जातीयवाद. समाजवाद साम्यवाद अशा विविध माध्यमातून सर्वात मोठा धोका आपण ओढावून घेतो
एक ज्वलंत उदाहरण देतो पूर्वी लोकसंख्या कमी होती जमीन मुबलक होती स्वच्छ निर्मळ पाणी स्वच्छ विचारसरणी असणारे लोक असा सर्व प्रकार होता. आज सर्वत्र उलट झाल आणि भयानक लोकसंख्या वाढली आणि जमीन कमी झाली. लोकांना रहाण्यासाठी जागा कमी पडायला लागली. जुन्या काळात साधी झोपडी सारखी घर होती नंतर माती कुंभारी कौलाची घर त्यांनंतर पत्रा आणि आत्ता प्रत्येक समाजासाठी विविध नावाच्या घरकुल योजनांमुळे पक्की आणि स्लॅब अशी कायम आणि पक्की घर तयार झाली.
बेरोजगारी जास्त होती त्यामुळे लोकांच्या हातात पैसा कमी होता. आत्ताच्या काळात रोजगार वाढला आणि लोकांना पुरेशे नाही पण थोडा जगण्या पुरता व थोड का होईना पैसा शिल्लक पडायला लागला. आणि सर्वत्र कमी जागेत मोठ मोठी अपार्टमेंट फ्लॅट खरेदी विक्री करण्यासाठी बांधण्यात आले आहे. लोक सुद्धा मजल्यावर मजले बांधकाम लागलें कमी जागेत टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या लोक अतिक्रमण करायला लागली. एवढं अतिक्रमण झाले की लोकानी गटारावर सुध्दाच काय स्मशानभूमी समाजभूमी मंदिर यावर सुध्दा लोकांनी अतिक्रमण केले सर्वात महत्वाचे म्हणजे आपले घरांचे बांधकाम करत असताना जागा पाठिमागे सोडतात आणि समोर पूर्णपणे लाईट विद्युत वाहिनी पर्यंत बांधकाम केल जात आहे त्यामुळे आज बांधकाम कामगार यांच्या जीवीताचा धोका वाढला आहे
सुरक्षेचा आभाव ही एक आजची जटील समस्या आहे. घरांचे बांधकाम चालू केले की त्यासाठी २२ प्रकारचा कामगार लागतो त्या प्रामुख्याने बांधकाम कामगार म्हणजे गंवडी. सेंटरींग. असे पायाडावर काम करणारे कामगार असतात. या सर्व बांधकाम कामगार यांना कोणतीही सुरक्षा नाही. लाईट तारा बिल्डिंग जवळून गेलेल्या असतांत. त्याला कोणतेही कोटींग केले जात नाही. आणि बांधकाम तारा जवळचं असतं. म्हणजे बांधकाम मालक बांधकाम कामाच्या पाठिमागे बरिच मोकळी जागा ठेवतात आणि लाईट तारा जवळचं बांधकाम करुन आपली जागा वाचविण्यासाठी बांधकाम कामगार यांचा जीव धोक्यात घालत आहेत. म्हणजे न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा असा प्रकार आहे जिल्ह्यात वरचेवर बांधकाम कामगार कामांवर असताना शाॅक लागून मयत झाल्याच्या घटना आपण वाचतो दूरदर्शन वर बघतो आणि अरे अरे वाईट झाल एवढंच म्हणतो मग आत्ता या बांधकाम कामगार यांच्या मृत्यूस आणि अपघातात अपंग होतात याला जबाबदार कोण. तर यासाठी बांधकाम मालकांना व बांधकाम व्यावसायिक व ठेकेदार इंजिनिअर कंत्राटदार हेच आहेत अपघात झाला असेल तर या सर्व बांधकाम व्यावसायिक मालक ठेकेदार कंत्राटदार इंजिनिअर यांचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांचेसाठी शैक्षणिक वैद्यकीय आर्थिक विमा अशा विविध १९ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यात आत्ता बांधकाम कामगार यांचेसाठी कामगार कामावर असताना संरक्षण मिळावे बांधकाम कामगार अपघातांत मृत्यू व अपंगत्व ह्यापासून संरक्षण व्हावे यासाठी सुरक्षा संच वाटप करण्यात येतात. बूट. हेल्मेट सुरक्षा बेल्ट. बॅटरी. सतरंजी. पाण्याची बाटली.पत्रयाची पेटी सुरक्षा जॅकेट. अशा विविध वस्तू बांधकाम कामगार यांच्या सुरक्षेच्या हेतूने मंडळाकडून देण्यात येतात. पण आज ठेकेदार कंत्राटदार इंजिनिअर यांच्या पैसे घेऊन बांधकाम कामगार यांच्या नोंदणीसाठी लागणारे दाखले दिले जातात. त्यामुळे बोगस कामगार नोंदणीला उत आला आहे खरोखरच कामगार असणारे या सुरक्षा संच पासून कोसो दूर आहेत. आज जवळपास जिल्ह्यात ६० हजार सुरक्षा संच वाटप करण्यात आले आहेत अस सहहयक कामगार आयुक्त भवन यांचे म्हणणे आहे पण आज कोणत्याही कामांवर सुरक्षा संच वापरला जात नाही मग एवढे सुरक्षा संच गेले कुठे. याचे वाटप करण्यापेक्षा ज्यांना हे सुरक्षा संच वाटप झाले आहेत ते वापर करतात का नाही याचा सर्वे होणे गरजेचे आहे. वापर होत नसेल तर अशया बांधकाम कामगार यांनी व ठेकेदार कंत्राटदार इंजिनिअर यानी मंडळाला चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक केली आहे तया अंतर्गत यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा