उत्तरप्रदेश:
उत्तर प्रदेशातील लखनऊ हाथरस येथे १५ दिवसांपूर्वी एका १९ वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. गंभीर अवस्थेत असलेल्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी पीडितेचा मृत्यू झाला.
सामूहिक बलात्कार झालेल्या १९ वर्षीय पीडित महिलेचा आज दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हाथरस येथे या दलित युवतीवर १४ सप्टेंबरला चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. गंभीर जखमी झालेल्या या युवतीला सोमवारी दिल्लीतील रुग्णालयात हलवण्यात आले होते. या युवतीच्या पाठीच्या मणक्याला गंभीर इजा झाली होती. तिला अर्धांगवायूही झाला होता.तिला रुग्णालयात आणल्यानंतरही तिचा जीव वाचवला जाऊ शकला नाही. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला, असे तिच्या कुटुंबीयांच्या हवाल्याने हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी सांगितले.
या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही नराधमांना अटक करण्यात आली असून आता त्यांच्यावर हत्येच्या गुन्ह्याचाही खटला चालवण्यात येईल, असेही हाथरसच्या पोलीस अधिक्षकांनी सांगितले.
तिला अलिगडमधील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते. मात्र तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे तिला दिल्लीला हलवले गेले.
आरोपींनी तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिची जीभ चावली गेल्याने तुटली होती. तिच्या हात-पायांना अर्धांगवायूही झाला होता.संबंधित पीडित युवती १४ सप्टेंबरला हाथरसमधील शेतातून बेपत्ता झाली होती. काही कालावधीनंतर ती गंभीर जखमी अवस्थेत सापडली होती.