इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरालगतच्या यड्राव येथे समाधान सोशल फौंडेशनच्या वतीने होळीचा अनाठायी खर्च टाळत प्रमोद बिराजदार या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेण्यात आली आहे. या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे.
यड्रावमधील समाधान सोशल फौंडेशनच्यावतीने सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदाही होळी सणासाठी होणार्या अनाठायी खर्चाला फाटा देत प्रमोद बिराजदार या विद्यार्थ्याच्या वार्षिक शैक्षणिक खर्चाचे पालकत्व घेण्यात आले आहे. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत फौंडेशनच्यावतीने वतीने ही भेट देण्यात आली. यावेळी सर्वांनी मिळून त्याचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. याप्रसंगी विविध मान्यवरांनी प्रमोद या विद्यार्थ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विविध स्वरुपात भेटवस्तू दिल्या.तसेच आणखी काही मतिमंद व गरजू मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा फोंडेशनचा मानस असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी यड्रावचे ग्रा.पं सदस्य बाबासो राजमाने,अशोक बोरवणकर, अॅड. विनोद जगदाळे, मयुर कुंभोजे,इजि राजेश देसाई,सुरेश कुलकर्णी, उत्तम चव्हाण, शशिकांत परीट, मनोहर कुंभार, सुधीर कुंभार, वृषभ कुंभोजे ,सुरज कुंभोजे, राहुल पाटील ,शीतल चौगुले,कुबेर पाटील ,सचिन पाटील, शितल उपाध्ये, दिलीप कुंभार दादासो मठपती गंगाधर निराळे , श्रीधर कुंभोजे, अविनाश कुंभार , सचिन गरड , प्रवीण कुंभोजे ,योगेश कुंभोजे ,चेतन पटेल आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.