सावंतवाडी
तालुक्यातील दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव रविवारी दिनांक २० मार्च रोजी तुकाराम बीज दिनी साजरा होणार असून, कोरोना नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा होणार असून, भाविकांनी उत्साहात सहभागी होऊन तीर्थ प्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे विश्वस्त श्रीमंत खेम शिवराम सावंत भोसले यांनी केले आहे.