You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेच्यावतीने विधितज्ञ दिवंगत वकील दीपक नेवगी यांना वाहिली श्रद्धांजली

कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेच्यावतीने विधितज्ञ दिवंगत वकील दीपक नेवगी यांना वाहिली श्रद्धांजली

दिनांक १४ मार्च २०२२ रोजी सावंतवाडी येथील कायदेतज्ञ, कीर्तनकार दिवंगत दीपक नेवगी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. साहित्य चळवळीत, सामाजिक उपक्रमात भरीव कार्य करणारे तसेच कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती करणाऱ्या दीपक नेवगी यांना कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सावंतवाडी शाखेच्यावतीने श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे शोकसभेचे आयोजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. सावंतवाडी कोमसापचे तसेच श्रीराम वाचन मंदिरचे माजी अध्यक्ष म्हणून वकील दीपक नेवगी यांनी काम पाहिले होते. सावंतवाडीतील साहित्य चळवळीत त्यांचे अमूल्य योगदान होते. साहित्याबरोबरच समाजात जागृती निर्माण करण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून ते समाजाला दिशादर्शक असे संदेश देत होते. विविध संस्थांमध्ये तसेच महाविद्यालय मध्ये त्यांनी विधी विषयक मार्गदर्शन केले होते. कोमसापच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये ते हिरीरीने भाग घ्यायकचे. दीपक नेवगी यांच्या जाण्याने कोमसापने तसेच साहित्य क्षेत्राने एक हिरा गमावल्याची खंत कोमसापच्या पदाधिकारी तसेच सदस्यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित केलेल्या शोकसभेत कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, माजी तालुकाध्यक्ष सुभाष गोवेकर, डॉक्टर जी. ए. बुवा, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कोमसापक्या सचिव प्रतिभा चव्हाण, कार्यकारणी सदस्य वकील नकुल पार्सेकर, दीपक पटेकर, मेघना राऊळ, उज्वला केरकर, जयराम आजगावकर, विठ्ठल कदम, कोषाध्यक्ष दीपक तुपकर, ज्ञानदीप मंडळाचे संस्थापक वाय. पी. नाईक, शरद शिरोडकर, आदींनी दिवंगत वकील दीपक नेवगी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित सभेत कोमसापचे कार्यकारणी सदस्य विनायक गांवस, प्रज्ञा मातोंडकर, सह सचिव राजू तावडे तसेच प्रवीण ठाकूर डॉ.गुंजाटे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा