*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या “बियोंड सेक्स” या प्रसिद्ध कादंबरीच्या लेखिका सोनल गोडबोले यांचा लेख*
*… चुकुन तिचा हात धरला तर ??….*
थोडे वेगळे टायटल वाटले ना.. हेच ते वाक्य ज्याने मला बुचकाळ्यात पाडले होते. माझा मित्र म्हणाला सोनल खुप टेंशन आलय .. उद्या मुलीच्या आईसोबत सोलापूरला जायचय . मुलीची आई म्हणजे बायको रे भाऊ😃… त्या दोघांचा ३६ चा आकडा त्यामुळे त्यांचं काही जमत नाही.. खुप वर्षे एकमेकांशी बोलत नसल्याने त्यांना काय बोलावं कळत नाही.. याला मैत्रीणीसोबत फिरायची सवय त्यामुळे चुकुन मुलीच्या आईच्या खांद्यावर हात ठेवला तर किवा तिचा हात हातात घेतला तर या भितीने त्याला घाम फुटलाय…
ही काल्पनिक कथा नाही.. सत्य घटना आहे.. ऐकावे ते नवलच आणि तरीही घटस्फोट न घेता दोघे एकत्र रहातात..
अशी अनेक जोडपी या जगात सायलेंट राहुन संसार करत असतील.. भांडुन किवा घटस्फोट घेउन मुलांच्या मनावर परिणाम होइल किवा समाज काय म्हणेल किवा नातेवाईक या सगळ्यात दोघे एकमेकांना भरडुन घेतात.. याला संसार म्हणायचा कि अजुन काही?? .. दोघेही भरपुर कमावतात त्यामुळे आर्थिक दृष्ट्या कोणी कोणावर अवलंबून नाही.. त्यामुळे त्यांना एकेमेकांची गरज नसावी बहुधा.. व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरं…
या विचित्र स्वभावाची दोन मंडळी कशी आणि का एकत्र आली असावीत ?? .. विधिलिखितच असावं ना… सौंदर्य आहे. पैसा आहे पण सुख नाही.. ते सुखी आहेत हे मात्र नक्की भासवतात.. सगळ्याना सगळे मिळत नाही हेच खरं ना….
तुम्हीही नक्कीच अशी जोडपी पाहीली असतील..
सोनल गोडबोले