तालुक्यातील अचानक आलेल्या पूरस्थिती मुळे भात शेतीसह बागायती व घरे,दुकानांमध्ये पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर मे महिन्यापूर्वी नदी अथवा खाडीतील गाळ काढावा अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे कुडाळ प्रभारी तालुकाध्यक्ष अभय शिरसाट व पदाधिकारी उपस्थित होते सांगेलकर यांनी याबाबतचे लेखी निवेदन नामदार थोरात यांना सादर केले.
सावंतवाडी तालुक्यातील बांधा व सखल भागामध्ये नदीचे पात्र रुंदावले असून नदी आणि खाडी मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरी नद्यांना पूर येतो आणि हे पुराचे पाणी घरामध्ये दुकानांमध्ये तसेच भात शेती आणि बागायती मध्ये शिरून पूरस्थिती निर्माण होऊन मोठे नुकसान होते त्यामुळे नदी मधील काळ उपसा करण्याचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे मात्र गाळ उपसा करण्याचा कार्यक्रम द्रुतगतीने घेण्यात यावा व मे महिन्यापूर्वी नदी आणि खाडी चा गाळ उपसा करण्यात यावे अशी मागणी सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
याचबरोबर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे दोन पुल शहराला जोडणारे उभारण्यात यावे यासाठी प्रत्येकी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने महेंद्र सांगेलकर यांनी केली आहे याबाबतचे लेखी निवेदन आमदार अशोक चव्हाण यांना त्यांनी सादर केले यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे कुडाळ प्रभारी तालुकाध्यक्ष अभय शिरसाट आदी उपस्थित होते सांगेलकर यांनी या दिलेल्या निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की सावंतवाडी शहराला जोडणाऱ्या ब्रिज ऐवजी पूल बांधण्यात यावा यासाठी प्रत्येकी दीड कोटी रुपये अर्थसंकल्पातून मंजूर करावे अशीही मागणी केली आहे सावंतवाडी शहरामध्ये कोलगाव निरुखे वाडी येथून भटवाडी भागात येण्याकरिता दोन ब्रिज आहेत हे ब्रिटिश कालीन ब्रिज असून पाऊस मोठा झाला की यावरून पाणी जाते आणि शहराकडे येणारा मार्ग बंद होतो त्यामुळे हे जुने झालेल्या ब्रिज वर पूल उभारण्यात यावा याकरिता प्रत्येकी दीड कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी अशी मागणी तालुकाध्यक्ष सांगेलकर यांनी केली आहे दरम्यान या मागणीकडे सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे