जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरविंदजी ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना
कधी तिच्या जवळ असताना
शब्दाविण बोलत होती
ती अदृश्य ओढ नात्याची
आज ही जाणवत होती
जरी जुना पुराना वाडा
माज साठी महाल होता
त्या रम्य स्मृतींना तेंव्हा
केला मी बहाल होता
कधी अभ्यासाचे ओझे
तिज साठी वागवत होतो
वही पुस्तकं डोळ्या पुढती
अक्षरे नाचवत होतो
जग कसे घरा बाहेरी
मज तीच दाखवत होती
कोवळी उन्हाची किरणे
माज साठी वेचित होती
मी पुन्हा नव्याने बघतो
अजुनी ती तशीच दिसते
अन धूळ खात बिचारी
जणू माझी वाट पहाते
हे ऋणानुबंधच सारे
मज जाणवते हे जेंव्हा
वाड्यातील जुनाट खिडकी
हृदयात उघडते तेंव्हा
अरविंद