You are currently viewing श्रीमंत जिजाऊ प्रतिष्ठानतर्फे मोफत मोतीबिंदू तपासणी – शस्त्रक्रिया शिबीर

श्रीमंत जिजाऊ प्रतिष्ठानतर्फे मोफत मोतीबिंदू तपासणी – शस्त्रक्रिया शिबीर

इचलकरंजी / प्रतिनिधी

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्रीमंत जिजाऊ प्रतिष्ठानच्या
वतीने प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी गरजू रुग्णांची मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया
शिबीर तसेच लेन्स बसवण्याचा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती
प्रतिष्ठानचे इचलकरंजी शहराध्यक्ष दत्तात्रय जाधव यांनी दिली.तसेच कुपवाडमधील लायन्स नेञ नॅब रुग्णालयाच्या सहकार्याने होणा-या या शिबीराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले.

आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो ,याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अतिग्रेतील सारंग पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने
युवकांच्या संघटीत ताकदीच्या जोरावर देव ,देश आणि धर्माची सेवा करण्याच्या उदात्त हेतूने श्रीमंत जिजाऊ प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेची स्थापना केली.तसेच या संघटनेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ जयंती , शिवजयंती यासह विविध सण , उत्सवाच्या निमित्ताने मुलींना शैक्षणिक दत्तक घेणे ,वाॅकथाॅन आयोजित करुन शेतकरी बांधवांना आवश्यक मदत करणे , महिला दिनानिमित्त महिलांची आरोग्य तपासणी शिबिर , वाढदिवसानिमित्त शाळांना गरजोपयोगी साहित्य व धान्य उपलब्ध करुन देणे ,कोरोनाकाळात गरीब व गरजू कुटुंबांना धान्य वाटप करणे , बायोमेट्रिक मशीन बसवणे यासह मोफत नेञ मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर , युवकांना व्यसनमुक्त करतानाच झाडांचे रोपन , रक्तदान शिबीर
असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत.विशेष म्हणजे कुपवाडच्या लायन्स नेञ नॅब रुग्णालयाच्या सहकार्याने गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया आणि लेन्स बसवण्याचा उपक्रम राबवत या संघटनेने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे.या उपक्रमाने अनेकांना जगण्याची नवी दृष्टी मिळाली आहे.
प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी गरजू रुग्णांची मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया तसेच लेन्स बसवणे शिबीराचा लाभ घेण्यासाठी गरजू रुग्णांनी इचलकरंजीतील जुने शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोरील
बसवेश्वर पतसंस्था इमारत गाळा नं २ ,श्री.लाॅर्ड बालाजी व्हेंन्चुअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन प्रतिष्ठानचे इचलकरंजी शहराध्यक्ष दत्तात्रय जाधव ( मो .8999964425 ) यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा