You are currently viewing वडिलांच्या वाढदिवसानिमित्त  नवलराज काळे व ॲड. विक्रमसिंह काळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त  नवलराज काळे व ॲड. विक्रमसिंह काळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

अचिर्णे व सडूरे उपकेंद्रातील माजी आरोग्य सेवक (काळे डॉक्टर) यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण विद्यालय अचिर्णे व विकास विद्यालय सडूरे अरूळे शाळेतील दहावीच्या परीक्षार्थीना श्री माऊली चारीटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग च्या वतीने करण्यात आले साहित्य वाटप

वैभववाडी-

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही मुलांनी म्हणजेच नवलराज विजयसिंह काळे व ॲड विक्रमसिंह काळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी. अचिर्णे व सडूरे उपकेंद्रातील माजी आरोग्य सेवक (काळे डॉक्टर) यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण विद्यालय अचिर्णे व विकास विद्यालय सडूरे अरूळे शाळेतील दहावीच्या परीक्षार्थीना श्री माऊली चारीटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले साहित्य वाटप. योगायोगाने या दोन्ही शाळेचे हे दोघे बंधू माजी विद्यार्थी आहेत. ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये काहीतरी उपक्रम राबवायचा अशा उद्दिष्टाने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त काळे बंधूनी हा उपक्रमात हातामध्ये घेतला व तो संपन्न केला, या आधी देखील या दोन्ही विद्यालय मध्ये नवलराज काळे यांनी आरोग्य शिबिरे भरवली होती. वडिलांबद्दल असलेला आदर वडिलांनी केलेल्या कष्टामुळे आपण घडलो आहोत याची असलेली जाणीव या 21 व्या शतकात आई वडिलांच्या बद्दल असलेला आदर सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, त्यांच्या सामाजिक कार्यातून समाजासाठी काहीतरी करावं ही जाणीव त्यांच्या कार्यातून समाजाला दिसून आली या दोन्ही मुलांकडून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे प्रतिपादन शाळेच्या शिक्षिका सौ रावराणे मॅडम यांनी केले. उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांनी व शाळेच्या शिक्षकांनी काळे बंधू भरभरून कौतुक केले व काळे डॉक्टर या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या विजयसिंह विठ्ठलराव काळे यांना भरघोस अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…

2002 पासून 2011 पर्यंत काळे अचीर्ने उपकेंद्रांमध्ये(अचिर्णे, खांबाळे लोरे नंबर 2) या गावात कार्यरत होते तर 2011 पासून 2017 पर्यंत काळे सडूरे उपकेंद्रांमध्ये(सडूरे शिराळे, अरुळे,निम अरूळे)या गावात कार्यरत होते. या सर्व गावात त्यांनी प्रामाणिक सेवा दिली, त्यांच्या कार्यप्रणालीवर ती आनंदी होऊन या पंचक्रोशीतील जनतेचे प्रेम, व आशीर्वाद त्यांना मिळाले आणि या केलेल्या सेवेचे फल म्हणून आज आम्ही या व्यासपीठावर उभे आहोत असे प्रतिपादन नवलराज काळे व ॲड विक्रमसिंह काळे यांनी केले. वीस वर्षाच्या कार्यकला मध्ये आमच्या वडिलांनी जनतेची सेवा केली त्या सेवेतून मिळालेले जनतेचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी कायमस्वरूपी राहिले आणि सामाजिक राजकीय वाटचालीमध्ये या आशीर्वादाचा प्रत्यक्षात आम्हाला अनुभव आला,प्रत्येक कामात जनतेचा सहभाग मिळाला सहकार्य मिळाले त्यामुळेच आज आम्ही या स्टेजवरती येऊन पोहचलो आहोत या सर्वांचं श्रेय आमच्या आई-वडिलांचं असून आपल्या सर्व जनतेचे प्रेम व आशीर्वादाने हे स्टेज भक्कम झाले आहे. आपले सर्वांचे प्रेम आशीर्वाद यापुढेही असंच राहू दे असे सांगत प्रशालेच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या व यापुढेही असे अनेक उपक्रम श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शाळेमध्ये घेऊ असं आश्वासन देखील दोन्ही बंधू यांनी याठिकाणी दिले, यावेळी अचीर्णे गावचे समाज सेवक आदेश रावराणे, आरोग्य सहाय्यक बाबाजी आडुळकर, सडूरे ग्रामपंचायतचे सदस्या पूनम रामाने, अचीर्णे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री देवकर टी. एम. सर,श्री संदीप महादेव तुळसकर श्री संजय महादेव तुळसकर सर,पाटील एस. के.,सौ रावराणे ए. बी.मॅडम,श्री घेरडे एस. एस.सर,श्री सावंत जी. जे. सर,शिक्षक इतर कर्मचारी मंदार सुतार तसेच सडूरे शाळेचे मुख्याध्यापक,लाड, डी.पी सर,शिक्षक माळवी एस. डी,कानडे ए.एम्. शिक्षक इतर शिक्षकेतर कर्मचारी वाघरे एस. बी. व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन माडवी व तुळसकर सर यांनी केले. सर्व शिक्षक वर्ग आणि दोन्ही काळे बंधूंना शुभाशीर्वाद देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. काळे डॉक्टर यांना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा