You are currently viewing १२ ते १४ वयोगटाच्या लसीकरण मोहिमेला उद्यापासून सुरुवात.

१२ ते १४ वयोगटाच्या लसीकरण मोहिमेला उद्यापासून सुरुवात.

मुंबई
देशात आता उद्यापासून १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यासाठी उद्यापासून खास मोहीम राबवली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केली आहे. तर ६० वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी ‘बूस्टर डोस’लाही मंजुरी देण्यात आली आहे. १६ मार्चपासून लसीकरण सुरू होणार आहे. लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाण्याची शक्यता आहे. एनटीएजीआयने १२ ते १४ या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली आहे. या वयोगटातील मुलांचे लसीकरण मंगळवारपासून सुरू होण्याची शक्यता ६० वर्षावरील व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येणार आहे. याआधी ६० वर्षावरील व्यक्तींना बुस्टर डोस घेण्यासाठी असलेले नियम शिथील करण्यात आले आहेत.
कोरोनाविरोधात देशव्यापी लसीकरण मोहीम सुरु आहे. कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या २४ तासात ४ लाख ६१ हजार ३१८ कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण १८० कोटी १९ लाख ४५ हजार ७७९ डोस देण्यात आले आहेत.“मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे! असे आरोग्यमंत्री मांडविया यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. तसेच, ६० वर्षांवरील वृद्धांनाही खबरदारीचा डोस किंवा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ‘मुलांच्या कुटुंबीयांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतो’, असे मांडवीय म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा