You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का? : दादा साईल…

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का? : दादा साईल…

उद्या दुपारी 11.00 वाजता पुन्हा होणार “ई जनसुनावणी” सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची घोषणा…

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व लोकांना वेठीस धरून गेले सलग तीन दिवस CRZ जनसुनावणी पूर्ण करण्यासाठी आटापिटा का चालवला आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्याला या बेडगी अधिकाऱ्यां शिवाय कोणी वाली आहे की नाही? असे सवाल सरपंच संघटना जिल्हा सरचिटणीस दादा साईल यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांचा CRZ कायद्याला विरोध नाहीय ही अत्यंत महत्त्वाची बाब जिल्हा प्रशासन का दुर्लक्ष करतेय याचा उलगडा होत नाही. केंद्र सरकारने CRZ पॉलिसी व आराखडा पूर्ण देशासाठी बनवली असून प्रत्येक राज्य सरकारने त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये त्याचे भाषांतर करून प्रत्येक बाधित कुटुंबा पर्यंत जन जागृती होण्यासाठी देण्याचे निर्देश दिलेले आहेत परंतु आपल्या जिल्ह्यात गेल्या 8 महिन्यांपासून  वारंवार मागणी करूनही या बाबत कोणतीच कारवाई झाले नाही.

लोकांना जर कायदाच समजला नाही किंवा प्रशासनाने पुढाकार घेवून समजावले नाही तर गरीब, गरजू, शेतकरी, आर्थिक दुर्बल आणि वंचित लोकांना आपली भूमिका, अडचणी, हरकती, आक्षेप, मत, प्रश्न, मागण्या, विचार, शंका कसे काय मांडू शकतील याकरता सरपंच संघटनेने वारंवार हा प्रारूप आराखडा आणि त्याचा नकाशा मराठी भाषेतून प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती. परंतु या सर्वांना केराची टोपली दाखऊन फक्त जनसुनावणी पूर्ण करण्याचा आटापिटा जिल्हाधिकारी यांनी का चालावला आहे? असा सवाल श्री. साईल यांनी उपस्थित केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या बाबत लक्ष घालून ही सुनावणी रद्द करावी. लोकांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करून मगच जनसुनावणी घ्यावी हीच अपेक्षा सिंधुदुर्ग सरपंच संघटना जिल्हा सरचिटणीस दादा साईल यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा